"प्र.ल. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
'''प्रभाकर लक्ष्मण मयेकर''' ([[४ एप्रिल]], [[इ.स. १९४६]] - [[१८ ऑगस्ट]], [[इ.स. २०१५]]:[[दादर]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे एक मराठी नाटककार होते. [[मालवणी बोलीभाषा|मालवणी बोलीतील]] त्यांची नाटके प्रसिद्ध झाली.

प्र.ल.मयेकर यांचा जन्म राजापूरमधील कोंभेवाडीतला. चौथीपर्यंतचे शिक्षण कोंभेवाडीत झाल्यानंतर प्र.लं.चा थेट मुंबईपर्यंतचा प्रवास झाला. मुंबईतील युनियन हायस्कूलमधल्या ग्रंथालयाने प्र.लं.च्या वाचनाची भूक भागवली.

मयेकर हे मुंबईत [[बी.ई.एस.टी.]] कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर [[रत्‍नागिरी]]ला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले.

मुंबई ही त्यांची कर्मभूमी होती, तरीही प्र.लं.ची नाळ मात्र रत्नागिरीशी जोडलेली होती. सेवानिवृत्तीनंतरही प्र.ल. मयेकरांनी कर्मभूमी सोडली आणि जन्मभूमी रत्नागिरी गाठली. रत्नागिरी शहरामध्ये वास्तव्य असताना त्यांचा रत्नागिरीतील रंगकर्मीशी स्नेह जुळला. रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीशी त्यांचे एक नाते निर्माण झाल. बेस्टनंतर समर्थ रंगभूमी ही माझी संस्था असे प्र. ल. त्यावेळी सांगत तेव्हा रत्नागिरीकरांनाही त्याचा अभिमान वाटायचा. या समर्थ रंगभूमीसाठी त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेकरिता यांनी नवे कोरे कुंतीपार्थिवा हे नाटक लिहिले. समर्थ रंगभूमी प्र.लं.च्या ऋणात कायम राहिली.

==लेखन प्रवास==
मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली.

१९८० मध्ये ‘आतंक’ हे प्र.ल. मयेकरांचे पहिले नाटक राज्य स्पर्धेच्या रंगमंचावर आले. १९८३ साली बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाने सादर केलेल्या प्र.लं.च्या “मा अस् साबरिन” या नाटकाने पहिले यश संपादन केले आणि मग रंगमंचावर दर्जेदार नाटकांचा प्रलय आला. राज्य नाट्य स्पर्धेत बेस्टच्या नाटकांचा एक दबदबा निर्माण झाला. नाटकातील व्यक्तीरेखेची भाषाशैली हे प्र.ल.मयेकरांचे आणखी एक वैशिष्ट्य. “अथ मनुस जगन हं…” ‘जंगल्याची भाषा’ या नाटकात पाहायला मिळते. जंगल्याच्या भाषेची निर्मिती प्र.लं.नीच केली. कारण अशी भाषा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बोलली जात नाही.

‘अग्निपंख’ मधील रावसाहेब आणि बाईसाहेब यांची १९४८ सालातील कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा, ‘रातराणी’मधील ऍना स्मिथ हीच अँग्लोइंडियन स्पीकिंग, ‘पांडगो’मधील तात्याचा मालवणी बाज, तक्षकयाग मध्ये अंगावर राष्ट्रभक्तीचा रोमांच उमटवणारी भाषा, ‘कुंतीपार्थिवा’मधील पौराणिक भाषा त्यांच्या पात्रांच्या भाषाशैलीतच त्या व्यक्तिरेखा लपलेल्या असायच्या. ‘सवाल अंधाराचा’मधील नायकाचा राकटपणा, ‘रानभूल’मधील रंगाचा रांगडेपणा, रातराणीमधील सॅलीचा कावेबाजपणा, निव्वळ भाषाशैलीमुळे वेगळा वाटणारा ‘सोनपंखी’मधील डबलरोल, मानवी प्रवृत्ती.. भावना… कथानकात धक्के देत रंगमंचीय चतुराई दाखवणारे ‘दीपस्तंभ,’ मराठी माणूस आणि परप्रांतीयांवर भाष्य करणारं ‘मि. नामदेव म्हणे,’ प्रख्यात नाटककार वसंत कानेटकरांच्या सकंल्पनेवर आधारित ‘हासू आणि आसू…’ मराठी रंगभूमीनंतर हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे डॅडी आय लव्ह यू, शरद पवारांच्या जीवनावरचे ‘सत्ताधीश…’ भुताची नाकेबंदी केल्यानंतर चौथी भिंत तोडून पळणारे भूत….मोज्यांच्या वासालाच घाबरून पळणारे भूत अशा भन्नाट कल्पना असणारे ‘पांडगो इलो रे बा इलो…’, ‘रानभूल’ आणि ‘दीपस्तंभ’ ही नाटे पुनर्जीवित होऊन नव्या पिढीतल्या नाट्यरसिकांसमोर आली.

नाटकांबरोबरच प्र.लं.च्या एकांकिकाही गाजल्या. आय कन्फेस, अतिथी, रक्तप्रपात, होस्ट, अब्द शब्द, अतिथी सारख्या अर्ध्या तासात चिरेंबद होणाऱ्या एकांकिका. महाभारताचे उत्तर रामायण आणि रावणायन सारख्या विनोदी एकांकिका आजही स्पर्धा गाजवतात. चित्रपटांच्या कथा-पटकथा-संवाद लेखन त्यांनी केले. पुत्रवती चित्रपट लेखनासाठी स्क्रीन आणि फिल्मफेअर अॅवार्डही प्र.लं.नी पटकावली. स्क्रीन त्याचबरोबर रथचंदेरी, दुरावा आणि दुहेरी या दूरचित्रवाणी मालिकांचे लिखाण करत प्र.ल.मयेकरांनी सर्व माध्यमे व्यापून टाकली. चित्रकथी मालिकेच्या काही पटकथा प्र.ल.नी लिहिल्या आहेत.

मसीहा हा प्र.ल.चा पहिला कथासंग्रह राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार पटकावणारा ठरला. त्यानंतर काचघर हा कथासंग्रह लोकप्रिय ठरला. अग्निपंख, रातराणी, दीपस्तंभ आणि पांडगो इलो रे बा इलो ही नाटके पुस्तक स्वरूपात प्रकाशित आहेत. प्र.ल.मयेकरांच्या संहितानी महाराष्ट्राच्याही सीमा ओलांडत भाषेच्या सीमा पार केल्या. रेशमगाठ, राजारानी, अंतरपट, जुगलबंदी, प्रेम घिरय्या आणि डॅडी आय लव्ह यू ही नाटके गुजराती रंगभूमीवरही गाजली. इन्सान अभी जिंदा है, सुखा सैलाब, अंदमान, रेवती देशपांडे, कहाँ गुम हो गयी कमली आणि तिनका तिनका प्यार ही नाटके हिंदी राज्य नाटय़स्पर्धेत गाजली.

प्र.ल. मयेकर यांची ''मा अस साबरीन'', ''अथ मनुस जगन हं'', ''आद्यंत इतिहास'' असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो.

[[वसंत कानेटकर]] यांची नाटके करणार्‍या [[चंद्रलेखा (नाटकसंस्था)|चंद्रलेखा]] या [[मोहन वाघ]] यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके [[मच्छिंद्र कांबळी]] यांच्या [[भद्रकाली (नाटकसंस्था)|भद्रकाली]] संस्थेने रंगभूमीवर आणली.
[[वसंत कानेटकर]] यांची नाटके करणाऱ्या [[चंद्रलेखा (नाटकसंस्था)|चंद्रलेखा]] या [[मोहन वाघ]] यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके [[मच्छिंद्र कांबळी]] यांच्या [[भद्रकाली (नाटकसंस्था)|भद्रकाली]] संस्थेने रंगभूमीवर आणली.

कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. [[मुंबईतील गिरणी संप]] आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले.

प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला.

==लघुपट==
प्र.ल. मयेकरांवर एक 'प्र.ल.' नावाचा एक लघुपट निघाला आहे.

==प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके==
==प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके==
ओळ २२: ओळ ३७:
* आद्यंत इतिहास (प्रायोगिक)
* आद्यंत इतिहास (प्रायोगिक)
* आसू आणि हसू
* आसू आणि हसू
* कमलीचं काय झालं (प्रायोगिक)
* कमलीचं काय झालं (प्रायोगिक); (हिंदीत - कहाँ गुम हो गयी कमली?)
* काचघर
* काचघर
* गंध निशिगंधाचा (गुजरातीत अंतरपट)
* गंध निशिगंधाचा (गुजरातीत अंतरपट)
ओळ ५५: ओळ ७०:
* गोपीनाथ सावकार पुरस्कार
* गोपीनाथ सावकार पुरस्कार
* [[गो.ब. देवल]] पुरस्कार
* [[गो.ब. देवल]] पुरस्कार
* यु.आर.एल. फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२३-७-२०१४)
* यू.आर.एल. फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२३-७-२०१४)
* शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने रत्‍नागिरीला प्र.ल. मयेकर यांच्या नावाने ३ दिवसांचा नाट्य महोत्सव साजरा झाला होता. (जून २०१५)

१३:२९, १० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

प्रभाकर लक्ष्मण मयेकर (४ एप्रिल, इ.स. १९४६ - १८ ऑगस्ट, इ.स. २०१५:दादर, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली.

प्र.ल.मयेकर यांचा जन्म राजापूरमधील कोंभेवाडीतला. चौथीपर्यंतचे शिक्षण कोंभेवाडीत झाल्यानंतर प्र.लं.चा थेट मुंबईपर्यंतचा प्रवास झाला. मुंबईतील युनियन हायस्कूलमधल्या ग्रंथालयाने प्र.लं.च्या वाचनाची भूक भागवली.

मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्‍नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले.

मुंबई ही त्यांची कर्मभूमी होती, तरीही प्र.लं.ची नाळ मात्र रत्नागिरीशी जोडलेली होती. सेवानिवृत्तीनंतरही प्र.ल. मयेकरांनी कर्मभूमी सोडली आणि जन्मभूमी रत्नागिरी गाठली. रत्नागिरी शहरामध्ये वास्तव्य असताना त्यांचा रत्नागिरीतील रंगकर्मीशी स्नेह जुळला. रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीशी त्यांचे एक नाते निर्माण झाल. बेस्टनंतर समर्थ रंगभूमी ही माझी संस्था असे प्र. ल. त्यावेळी सांगत तेव्हा रत्नागिरीकरांनाही त्याचा अभिमान वाटायचा. या समर्थ रंगभूमीसाठी त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेकरिता यांनी नवे कोरे कुंतीपार्थिवा हे नाटक लिहिले. समर्थ रंगभूमी प्र.लं.च्या ऋणात कायम राहिली.

लेखन प्रवास

मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली. १९८० मध्ये ‘आतंक’ हे प्र.ल. मयेकरांचे पहिले नाटक राज्य स्पर्धेच्या रंगमंचावर आले. १९८३ साली बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाने सादर केलेल्या प्र.लं.च्या “मा अस् साबरिन” या नाटकाने पहिले यश संपादन केले आणि मग रंगमंचावर दर्जेदार नाटकांचा प्रलय आला. राज्य नाट्य स्पर्धेत बेस्टच्या नाटकांचा एक दबदबा निर्माण झाला. नाटकातील व्यक्तीरेखेची भाषाशैली हे प्र.ल.मयेकरांचे आणखी एक वैशिष्ट्य. “अथ मनुस जगन हं…” ‘जंगल्याची भाषा’ या नाटकात पाहायला मिळते. जंगल्याच्या भाषेची निर्मिती प्र.लं.नीच केली. कारण अशी भाषा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बोलली जात नाही.

‘अग्निपंख’ मधील रावसाहेब आणि बाईसाहेब यांची १९४८ सालातील कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा, ‘रातराणी’मधील ऍना स्मिथ हीच अँग्लोइंडियन स्पीकिंग, ‘पांडगो’मधील तात्याचा मालवणी बाज, तक्षकयाग मध्ये अंगावर राष्ट्रभक्तीचा रोमांच उमटवणारी भाषा, ‘कुंतीपार्थिवा’मधील पौराणिक भाषा त्यांच्या पात्रांच्या भाषाशैलीतच त्या व्यक्तिरेखा लपलेल्या असायच्या. ‘सवाल अंधाराचा’मधील नायकाचा राकटपणा, ‘रानभूल’मधील रंगाचा रांगडेपणा, रातराणीमधील सॅलीचा कावेबाजपणा, निव्वळ भाषाशैलीमुळे वेगळा वाटणारा ‘सोनपंखी’मधील डबलरोल, मानवी प्रवृत्ती.. भावना… कथानकात धक्के देत रंगमंचीय चतुराई दाखवणारे ‘दीपस्तंभ,’ मराठी माणूस आणि परप्रांतीयांवर भाष्य करणारं ‘मि. नामदेव म्हणे,’ प्रख्यात नाटककार वसंत कानेटकरांच्या सकंल्पनेवर आधारित ‘हासू आणि आसू…’ मराठी रंगभूमीनंतर हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे डॅडी आय लव्ह यू, शरद पवारांच्या जीवनावरचे ‘सत्ताधीश…’ भुताची नाकेबंदी केल्यानंतर चौथी भिंत तोडून पळणारे भूत….मोज्यांच्या वासालाच घाबरून पळणारे भूत अशा भन्नाट कल्पना असणारे ‘पांडगो इलो रे बा इलो…’, ‘रानभूल’ आणि ‘दीपस्तंभ’ ही नाटे पुनर्जीवित होऊन नव्या पिढीतल्या नाट्यरसिकांसमोर आली.

नाटकांबरोबरच प्र.लं.च्या एकांकिकाही गाजल्या. आय कन्फेस, अतिथी, रक्तप्रपात, होस्ट, अब्द शब्द, अतिथी सारख्या अर्ध्या तासात चिरेंबद होणाऱ्या एकांकिका. महाभारताचे उत्तर रामायण आणि रावणायन सारख्या विनोदी एकांकिका आजही स्पर्धा गाजवतात. चित्रपटांच्या कथा-पटकथा-संवाद लेखन त्यांनी केले. पुत्रवती चित्रपट लेखनासाठी स्क्रीन आणि फिल्मफेअर अॅवार्डही प्र.लं.नी पटकावली. स्क्रीन त्याचबरोबर रथचंदेरी, दुरावा आणि दुहेरी या दूरचित्रवाणी मालिकांचे लिखाण करत प्र.ल.मयेकरांनी सर्व माध्यमे व्यापून टाकली. चित्रकथी मालिकेच्या काही पटकथा प्र.ल.नी लिहिल्या आहेत.

मसीहा हा प्र.ल.चा पहिला कथासंग्रह राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार पटकावणारा ठरला. त्यानंतर काचघर हा कथासंग्रह लोकप्रिय ठरला. अग्निपंख, रातराणी, दीपस्तंभ आणि पांडगो इलो रे बा इलो ही नाटके पुस्तक स्वरूपात प्रकाशित आहेत. प्र.ल.मयेकरांच्या संहितानी महाराष्ट्राच्याही सीमा ओलांडत भाषेच्या सीमा पार केल्या. रेशमगाठ, राजारानी, अंतरपट, जुगलबंदी, प्रेम घिरय्या आणि डॅडी आय लव्ह यू ही नाटके गुजराती रंगभूमीवरही गाजली. इन्सान अभी जिंदा है, सुखा सैलाब, अंदमान, रेवती देशपांडे, कहाँ गुम हो गयी कमली आणि तिनका तिनका प्यार ही नाटके हिंदी राज्य नाटय़स्पर्धेत गाजली.

प्र.ल. मयेकर यांची मा अस साबरीन, अथ मनुस जगन हं, आद्यंत इतिहास असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो.

वसंत कानेटकर यांची नाटके करणाऱ्या चंद्रलेखा या मोहन वाघ यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने रंगभूमीवर आणली.

कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले.

प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला.

लघुपट

प्र.ल. मयेकरांवर एक 'प्र.ल.' नावाचा एक लघुपट निघाला आहे.

प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके

  • अग्निपंख (गुजरातीत जुगलबंदी)
  • अंत अवशिष्ट
  • अथ मनुस जगन हं (प्रायोगिक नाटक, नाट्यस्पर्धेत चमकले)
  • अंदमान (प्रायोगिक)
  • अरण्यदाह (प्रायोगिक)
  • आतंक (प्रायोगिक)
  • आद्यंत इतिहास (प्रायोगिक)
  • आसू आणि हसू
  • कमलीचं काय झालं (प्रायोगिक); (हिंदीत - कहाँ गुम हो गयी कमली?)
  • काचघर
  • गंध निशिगंधाचा (गुजरातीत अंतरपट)
  • गोडीगुलाबी
  • तक्षकयाग
  • दीपस्तंभ
  • पांडगो इलो रे बा इलो
  • मा अस साबरीन (प्रायोगिक नाटक, १९८३ साली नाट्यस्पर्धेत बक्षीसपात्र ठरले)
  • मिस्टर नामदेव म्हणे
  • रण दोघांचे (गुजरातीत प्रेम घिरय्या)
  • रमले मी (गुजरातीत राजराणी)
  • रातराणी (गुजरातीत रेशमगाठ)
  • रानभूल
  • सवाल अंधाराचा
  • सोनपंखी

एकांकिका

  • अतिथी
  • अधुरी गझल
  • अनिकेत
  • कळसूत्र
  • रक्तप्रताप

मयेकर यांचे कथासंग्रह

  • काचघर
  • मसीहा

पुरस्कार