"अजिंठा (लेणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४७: ओळ ४७:
}}</ref>
}}</ref>
== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी अजिंठा लेण्या हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref> [http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067 महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा ] </ref>
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी अजिंठा लेण्या हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref> [http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067 महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा ] </ref> महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला [[दौलताबादचा किल्ला]], पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[रायगड किल्ला]], बुलडाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘[[एबीपी माझा]]’ने महाराष्ट्रातूनही '''सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा''' कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.


==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी==

१७:५८, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती


अजिंठा लेण्यांची निर्मिती ही एका विशिष्ट व्यक्तिची नसून त्यासाठी अनेकांची प्रतिभा व मेहनत कामी आली आहे.

इतिहास

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली...

रचना

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने १९८३ साली घोषित केलेली लेणी आहेत. या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.[१]

महाराष्ट्राचे आश्चर्य

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी अजिंठा लेण्या हे एक आश्चर्य ठरले आहे.[२] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ स्पिंक, वॉल्टर एम. (इंग्रजी भाषेत) http://books.google.co.in/books?id=UPqUHXlwXdcC&pg=PA3&redir_esc=y#v=onepage&q&f=false. २६ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. Going down into the ravine where the caves were cut, he scratched his inscription (John Smith, 28th Cavalry, 28th April, 1819) across the innocent chest of a painted Buddha image on the thirteenth pillar on the right in Cave 10.. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा

हेही पहा

चित्रदालन

बाह्यदुवे