"देवगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६५: ओळ ६५:
</gallery>
</gallery>


== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी दौलताबादचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref> [http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067 महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा ] </ref> महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला [[दौलताबादचा किल्ला]], पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[रायगड किल्ला]], बुलडाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘[[एबीपी माझा]]’ने महाराष्ट्रातूनही '''सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा''' कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.
== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
ओळ ७९: ओळ ८५:
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो



== हेसुद्धा पाहा==
== हेसुद्धा पाहा==

१७:५३, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

दौलताबाद

दौलताबादचा किल्ला
दौलताबादचे ठिकाण दाखविणारा नकाशा
दौलताबादचे ठिकाण दाखविणारा नकाशा
दौलताबाद
नाव दौलताबाद
उंची
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण औरंगाबाद, महाराष्ट्र
जवळचे गाव औरंगाबाद, दौलताबाद
डोंगररांग औरंगाबाद
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


'देवगिरी (अथवा दौलताबाद) 'हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.

इतिहास

१२वे शतक

बदामिचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, सुंगा, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा(२) या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.

पुढे सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याच्या अचूक तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले.मात्र, १२९६मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.[१]

इ.स. १२९६ ते इ.स. १३१०

१२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.

इ.स.१३१० ते इ.स.१३४७

अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा महंमद[ संदर्भ हवा ] या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.

इ.स. १३४७ ते इ.स.१५००

तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

दौलताबाद किल्ल्याला २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[२]

छायाचित्रे

महाराष्ट्राचे आश्चर्य

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी दौलताबादचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे.[३] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/aurangabad/CHAP02/ANCIENT%20PERIOD.htm औरंगाबाद गॅझेटिअर
  2. ^ (PDF) (इंग्रजी भाषेत) http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Aurangabad/Daulatabad%20fort%20and%20monument%20therein%20%28i.e.%20Chand%20Minar%29.pdf. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा

हेसुद्धा पाहा