"बौद्ध धर्माचे संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परि...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:३३, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती

बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. बुद्ध धम्माच्या नियमातील नरमपणा व विहार संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपूत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपूत संघ मानतो की त्यांते आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दूसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्यादेशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशात धम्म प्रचार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थिमुळे बौद्ध धम्मातील प्रार्थमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकले नव्हते.