"जालना जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १००: ओळ १००:
=== जिल्ह्यातील बाजारपेठा ===
=== जिल्ह्यातील बाजारपेठा ===
कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, शेवाळी
कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, शेवाळी
== प्रसिद्ध व्यक्ती ==
*[[समर्थ रामदास स्वामी]]
* जनार्दन मामा
*बद्रीनारायण बारवाले
*दासू वैद्य


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:२७, १६ मार्च २०१७ ची आवृत्ती

हा लेख जालना जिल्ह्याविषयी आहे. जालना शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


जालना जिल्हा
जालना जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
जालना जिल्हा चे स्थान
जालना जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय जालना
तालुके जालनाअंबडभोकरदनबदनापूरघणसवंगीपरतूरमंठाजाफ्राबाद
क्षेत्रफळ
 - एकूण ७,६१२ चौरस किमी (२,९३९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १९,५८,४६३ (२०११)
-लोकसंख्या घनता २५७ प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७३.६१
-लिंग गुणोत्तर १.०७ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी एस. जोंधळे
-लोकसभा मतदारसंघ जालना (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार रावसाहेब दानवे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ७६३ मिलीमीटर (३०.० इंच)
प्रमुख_शहरे जालना व सर्व तालुके
संकेतस्थळ


जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ. कि.मी. आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.

हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठाजाफ्राबाद.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मिमी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत.

जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमागयंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत.

याशिवाय येथे स्टील रीरोलिंगचा व्यवसाय चालतो.

जालना जिल्‍हा स्‍वतंत्र भारताच्‍या महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्‍या उत्‍तर दीशेस स्‍थीत आहे. जिल्‍हयाचे अक्षवृत्‍तीय व रेखावृत्‍तीय स्‍थान म्‍हणजे 1901 उत्‍तर ते 2103 उत्‍तर अक्षवृत्‍तीय व 7504 पुर्व ते 7604 पुर्व रेखावृत्‍तीय. जालना जिल्‍हा हा पुर्वी निझाम राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर औरंगाबाद जिल्‍हयामधील एक जालना तालुका झाला.

जालना हा औरंगाबादचा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्‍हा म्‍हणून स्‍थापीत झाला, व औरंगाबाद जिल्‍हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्‍हयातील परतूर असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समावेश करण्‍यात आले. जालना जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा स्थित आहे, औरंगाबाद पश्‍चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्‍तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे.

जालना जिल्‍हा 7612 चौ.कि.मी. क्षेत्राने व्‍यापलेला आहे, जे राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्‍या तुलनेत 2.47 % एवढा आहे. जालना जिल्‍हयाचे मुख्‍यालय जालना असून राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील राज्‍य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्‍हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्‍द असून स्‍टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील राज्‍यामध्‍ये जालना जिल्‍हा प्रसिध्‍द आहे.

जालना जिल्‍हयातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामामध्‍ये महत्‍वाची भूमीका पार पाडली होती. श्री जनार्धन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिलेली आहे.

स्थान व भौगोलिक परिस्थिती

भौगोलिकद्ष्टया जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते. जालना जिल्हा 19.1 ते 20.3 या उत्तर अक्षांश व 75.4 रेखांश ते 76.4 या पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे. जिल्हयाचे स्थान राज्यात साधारणपणे मध्यभागी आहे. जिल्हयाच्या उत्तर सीमेवर जळगाव, पुर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेकडे बीड, व पश्चिमेकडे औरंगाबाद हे जिल्हे वसलेले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 2.51 % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 1.32 % म्हणजे 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले 98.68 % म्हणजे 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्हयात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण 8 तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिल करीता दोन उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना व परतूर येथे आहे. जालना उपविभागांतर्गत जालना, बदनापूर , भोकरदन व जाफ्राबाद तहसिल असून, परतूर विभागात परतूर, अंबड, घनसावंगी व मंठा तहसिल येतात. प्रत्येक तहसिलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली (8) पंचायत समित्या कार्यरत आहेत.

जनगणना 2011 नुसार जिल्हयात एकूण 971 गावे असून त्यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्हयात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत. जिल्हयात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नागरी विभाग नसल्याने नगरपरिषदा नाहीत. जालना नगरपरिषद 'अ' वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा 'क' वर्गीय आहेत. जालना जिल्हयात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत.

नदी नाले

जिल्हयाच्या दक्षिण सिमेलगत गोदावरी नदी अंदाजे ६० कि.मी. इतकी जिल्हयातुन वाहते. त्यामुळे जिल्हयाचा दक्षिण भाग गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो. दुधनागल्हाटी या गोदावरीच्या उपनदया मध्य भागातून तर उत्तर भागातून पुर्णा, खेळणागिरजा या उपनदया वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातुन वाहते.

जमिनीचा प्रकार

जालना जिल्हयातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापुर, भोकरदन व जाफ्राबाद या तहसीलमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्हयाच्या दक्षिण व दक्षिणपुर्व भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापुस व रब्बीचे पिके चांगल्या प्रमाणात येतात. जिल्हयाच्या उत्तर भागाात विहीरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमीनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असुन भुगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.

वने

जिल्ह्यात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असून उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, औरंगाबाद, यांचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्हयातील जंगलव्याप्त क्षेत्र १०१.१८ चौ. कि.मी. आहे. एकूण भौगोलीक क्षेत्राच्या ते १.३१% येते. महाराष्ट्र राज्यात ५२१४ हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असुन त्याची भौगोलीक क्षेत्राची टक्केवारी १६.९५ % आहे. राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्ह्याच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त ०.१२ % येते. यावरुन जिल्हयातील जंगलव्याप्त क्षेत्र खुपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमीनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे. पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र साधारणपणे ३३% असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र अतिशय कमी आहे.

विद्युत निर्मिती, पुरवठा व वापर

विद्युत निर्मितीचा एकही प्रकल्प या जिल्हयात नाही. राज्य विद्युत मंडळामार्फत कोयना, पारस, परळी अशा नजीकच्या प्रकल्पापासुन वीज पुरवठा केला जातो. जिल्ह्यात चारही शहरांचे विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. जिल्हयात १०० % विद्युतीकरणामुळे वीजेची मागणी वाढत असुन, या वर्षाच्या अखेरपर्यंत २,२७,००० कनेक्शन देण्यात आले आहे.

खाणी व कारखाने

जिल्ह्यात एकूण ११६ नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या २६६७ इतकी आहे. त्यापैकी १४ कारखाने बंद आहेत. २००८ मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या १६५ होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी २० चालु कारखाने असुन त्यात २२९ कामगार आहेत. मुलभुत लोह व पोलाद चे उत्पादन करणारे ३४ चालु कारखाने असुन त्यात १५१९ कामगार आहेत. जिल्हयातील चालु कारखान्यातुन २००८ वर्षात कामगारांनी काम केलेल्या श्रमदिनाची संख्या ४.७३ लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे.

आर्थिक गणना

१९९८ नंतर आर्थिक गणना २००५ मध्ये घेण्यात आली. १९९८ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण ४०,४७७ उद्योग आहेत. त्यापैकी २९,८३० स्वयंकार्यरत उद्योग तर १०,६४७ आस्थापना होत्या. २००५ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण ६०,१८३ उद्योग आहेत. त्यापैकी ३५,८४८ स्वयंकार्यरत उद्योग तर २४,३३५ आस्थापना आहेत. मालकीच्या प्रकारानुसार सर्वात जास्त म्हणजे ५५,३२८ खाजगी, ४,३७७ सार्वजनिक व ४७८ सहकारी उद्योग आहेत. खाजगी उद्योगाची एकूण उद्योगाशी टक्केवारी ९१.९२ % येते. या उद्योगापैकी ४४,३५० (७३.६८%) ग्रामीण तर १५,८३३ (२६.३२%) नागरी भागात आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांची उद्योगाचे मालक म्हणुन एकूण संस्थेची टक्केवारी अनुक्रमे ७.४४ व ३.९० येते. जागेविरहीत कार्यान्वित असलेल्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी ३०.५३ आहे. शक्तीवर चालणाऱ्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी १२.५४ येते. जिल्ह्यात या गणनेनुसार १,६७,९२० कामगार आहेत. त्यापैकी ९४,२९५ (५६.१५ %) वेतनावर काम करणारे आहेत. प्रती आस्थापना कामगारांची सरासरी संख्या ७ आहे. जिल्ह्यात दर लाख लोकसंख्येमागे आस्थापनांची संख्या १,५१० आहे.

शिक्षणाच्या सोयी

जालना जिल्ह्यात १,५८९ प्राथमिक २१७ माध्यमिक व ३० उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत. दर लाख लोकसंख्येमागे ९९ प्राथमिक तर १५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४२ महाविद्यालये असुन त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९,३५४ आहे. एकूण ४,०७,८२९ विद्यार्थ्यांपैकी ५७.६४ % विद्यार्थी प्राथमिक शाळेत, ३९.९१ % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत तर उर्वरीत २.४५ % विद्यार्थी महाविद्यालयात आहेत. जिल्ह्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे, व माध्यमिक शाळांमधील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे.

वैद्यकीय व आरोग्य सेवा

जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खाजगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्ह्यात १२ रुग्णालये, १२ दवाखाने व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधुन १,१६३ खाटांची सोय उपलब्ध होती. त्यात ७२,१०० आंतर रुग्ण व ७,४०,३०० बाह्य रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना यांचे अंतर्गत ८ ग्रामीण रुग्णालये आहेत. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. १,४७,००० लोकसंख्येसाठी १ रुग्णालय तर ४०,३२४ ग्रामीण लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे ७२ खाटा असे प्रमाण आढळते.

धार्मिक स्थळे व पर्यटन

जालना जिल्ह्यात महत्वाची/प्रसिद्ध पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिद्ध असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास इ.स. ४०० वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा म्दंग तसेच वेणूबाईचा तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाड्यातील अष्टविनायकापैकी एक गणपती राजूर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही आहे. हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही आहेत. शिवाय रऊनापराडा ता. अंबड येथे प्रसिद्ध दर्गा असुन तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो.

हवामान

समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामान स्वाभाविकच विषम व कोरडे आहे. येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. एप्रिल- मे महिन्यात तापमान ४१ सेल्सिअसच्या पुढे जाते दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्टया जिल्ह्यातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्हयात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर, व मंठा या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्टया अधिक पाऊस पडतो. तर जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यात कमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो.

नद्या

गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. गोदावरी नदी औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिणा सीमा प्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून होतो. गोदावरीने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित करून जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील प्रमुख उपनदी असून ती औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमाभागात गोदावरीस मिळते.

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते. ही नदी भोकरदन व जाफराबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात प्रवेश करते. खेळणा, गिरजा, जुई, जीवरेखा, धामना या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण खेळणा नदीकाठी आहे.

दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. औरंगाबाद जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या जालना जिल्ह्यातील दुधनेच्या प्रमुख उपनद्या होत.

जिल्ह्यातील गावे

जाफ्राबाद

अंबड

घनसावंगी

जालना

मंठा

परतूर

अर्थकारण

जिल्ह्यातील बाजारपेठा

कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, शेवाळी

प्रसिद्ध व्यक्ती

संदर्भ

बाह्यदुवे