"अांबेडकरवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''आंबेडकरवाद''' ([['''Ambedkarism''') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सिद्धांतावर आधालेलं महान [[तत्त्वज्ञान]] आहे. आंबेडकरवाद भारतात सर्वाधिक प्रभावी तत्त्वज्ञान असून देशातील शोषित-पिडित लोकांसोबतच शेतकरी, श्रमिक, महिलाधिकारी, राजनेते, समाज इत्यांदी क्षेत्रातील लोक प्रभावित झाले आहेत.
'''आंबेडकरवाद''' ('''Ambedkarism''') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सिद्धांतावर आधालेलं क्रांतिकारी [[तत्त्वज्ञान]] आहे. आंबेडकरवाद भारतात सर्वाधिक प्रभावी तत्त्वज्ञान असून देशातील शोषित-पिडित लोकांसोबतच शेतकरी, श्रमिक, महिलाधिकारी, राजनेते, समाज इत्यांदी क्षेत्रातील लोक प्रभावित झाले आहेत. आंबेडकरवादाला अनुसरणाऱ्यांना '''आंबेडकरवादी''' (Ambedkarist) आणि '''आंबेडकरी''' (Ambedkarite) म्हणतात.


[[समता]], [[स्वातंत्र्य]], [[बंधुत्व]], [[न्याय]], [[बौद्ध धर्म|धम्म]], [[लोकशाही]], महिलाधिकार, [[अहिंसा]], [[सत्य]], [[मानव|मानवता]], [[विज्ञान]]वाद, [[संविधान]] ही आंबेडकरवादाची तत्त्वे आहेत.
[[समता]], [[स्वातंत्र्य]], [[बंधुत्व]], [[न्याय]], [[बौद्ध धर्म|धम्म]], [[लोकशाही]], महिलाधिकार, [[अहिंसा]], [[सत्य]], [[मानव|मानवता]], [[विज्ञान]]वाद, [[संविधान]] ही आंबेडकरवादाची तत्त्वे आहेत.

१७:११, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

आंबेडकरवाद (Ambedkarism) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धांतावर आधालेलं क्रांतिकारी तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरवाद भारतात सर्वाधिक प्रभावी तत्त्वज्ञान असून देशातील शोषित-पिडित लोकांसोबतच शेतकरी, श्रमिक, महिलाधिकारी, राजनेते, समाज इत्यांदी क्षेत्रातील लोक प्रभावित झाले आहेत. आंबेडकरवादाला अनुसरणाऱ्यांना आंबेडकरवादी (Ambedkarist) आणि आंबेडकरी (Ambedkarite) म्हणतात.

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धम्म, लोकशाही, महिलाधिकार, अहिंसा, सत्य, मानवता, विज्ञानवाद, संविधान ही आंबेडकरवादाची तत्त्वे आहेत.

आंबेडकरवाद ही एक मानवाच्या मन, विचार आणि वृत्तीमधील परिवर्तनाची जननी आहे.

आंबेडकरवादाचा भारतीय समाजवरील प्रभाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय समाज जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. भारत देशातील लोकसंख्येचा तिसऱ्याहून अधिक हिस्सा (एक तृतिअंश) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेला आहे. आणि बाबासाहेबांचे एवढे प्रचंड अनुयायी आहेत. बाबासाहेब हे पददलितांचे उद्धारक होतेच शिवाय ते देशात शोषित, पिडित, गरीब, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचेही उद्धारक होते. भारत देशातील ८५% जनतेकरिता बाबासाहेबांनी कार्य केले आहे त्यांच्या हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले आहेत. उर्वरित १५% जनता ही अतिश्रीमंत, सत्ताधारी व सवर्ण होती.

जातिव्यवस्थेचे उच्चाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेस खिंडार पाडले; तिचे उच्चाटन होण्यास चालना मिळाली. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.

अस्पृश्यांची उन्नती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ युगपुरूष व सर्वश्रेष्ठ क्रांतीकारक होते. त्यांच्या महान क्रांतिकारी कार्यामुळे हजारों वर्षापासून उच्च जातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या कोट्यवधी अस्पृश्यांमध्ये एकता व जागृती निर्माण झाली. अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणिव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची त्यांना जाणिव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. आज सरकार समाजकल्याणाच्या विविध योजना राबविते. त्याचे मोठे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात जाते. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना अधिकार, मालमत्ता व उच्च सामाजिक दर्जा मिळविणे शक्य झाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.

बौद्ध धर्माचा प्रसार

एकेकाळी भारतात जन्मलेल्या, भारताचा राजधर्म असलेल्या आणि भारताबाहेरही अनेक देशांत पसरलेल्या पसरलेल्या महान बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात ऱ्हास घडून आला. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २०व्या शतकाच्या मध्य मध्ये कोट्यवधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारल्याने भारतात बौद्ध धर्माच्या प्रचारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही अनेक राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्विकारला आणि ६० वर्षापासून दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने स्विकारतही आहेत. इतरही अनेक उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्यपाली भाषा यांच्या अभ्यासाची सुरूवात केली. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्विकारल्याने बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. यातूनच बौद्ध धर्म प्रचारास चालना मिळाली.

आमूलाग्र परिवर्तनास चालना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. जातिव्यवस्थेत परिवर्तन होण्यास सुरूवात झाली. शिवाय विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जातीजमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.

दलित चळवळीचा उदय

मानवतेचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नि:स्वार्थी प्रयत्नांमुळे दलित चळवळ ीचा उदय झाला. सुरूवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. परिणामी, आज दलित चळवळीचा विस्तार झाला आहे. दलित चळवळीला आज प्रामुख्याने ‘आंबेडकरवादी चळवळ’ म्हटले जाते.