"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बौद्ध सणाचे नवीन लेख बनवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:११, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतीय बौद्धांचा एक प्रमुख सण आहे. जगभरातून लाखों बौद्ध अनुयायी एकत्र येऊन दरवर्षी १४ आक्टोबर या दिवशी दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात.

इतिहास

इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात.

२०व्या शतकाच्या मध्य मध्ये भारतीय संविधानाचे निर्माते, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्याच दिवशी १४ आक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्विकारला होता तेव्हा बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५०० होते. १४ आक्टोबर या दिवशी विश्वातील अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ हा उत्सव आनंदात साजरा करतात. हा सण व्यापक रूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध अनुयायांद्वारा साजरा केला जातो.[१]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक जगात बौद्ध धर्म स्विकारुन भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले.[२]

या सणात जगातील प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती आणि भारतातीव प्रमुख राजनेते सहभागी होतात.[३]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ http://www.thehindu.com/news/national/dalits-throng-nagpur-on-dhammachakra-pravartan-din/article6469961.ece
  2. ^ http://www.countercurrents.org/tag/dhamma-chakra-pravartan-day/
  3. ^ http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283