"मॅक्सीन बर्नस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मॅक्सिन बर्नसन (जन्म : ७ ऑक्टोबर, इ.स. १९३५; हयात) या फलटणच्या प्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. मॅक्सिन बर्नसन (जन्म : ७ ऑक्टोबर, इ.स. १९३५; हयात) या [[फलटण]]च्या प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापिका होत. कधी फलटण, कधी हैदराबाद तर कधी अमेरिका येथे त्यांचे वास्तव्य असते वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांचे भाषा समृद्धी संशोधनाचे कार्य चालू असते.
डॉ. मॅक्सीन बर्नसन ( Dr. Maxine Berntsen) (जन्म : ७ ऑक्टोबर, इ.स. १९३५; हयात) या [[सातारा]] जिल्ह्यातल्या [[फलटण]] येथील प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापिका होत. कधी फलटण, कधी हैदराबाद तर कधी अमेरिका येथे त्यांचे वास्तव्य असते वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांचे भाषा समृद्धी संशोधनाचे कार्य चालू असते.

डॉ. मॅक्सीन बर्नसन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३५ ला अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातील एस्कनाबा येथे झाला. त्यांचे वडील नॉर्वेच्या तर आई फिनलंडच्या विस्थापित कुटुंबातून आल्या होत्या. मिनिसोटाच्या ऑग्सबर्ग कॉलेजमधून बी. ए. केल्यानंतर त्यांनी तेथील शाळेत एक वर्ष इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर त्यांना न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम्. ए. करण्यासाठी अतिशय प्रतिष्ठित वुडरो विल्सन फेलोशिप मिळाली. पदवी मिळाल्यानंतर डॉ. बर्नसन यांनी आयोवातील डेकोरा येथील ल्यूथर कॉलेजात दोन वर्षे इंग्रजी शिकवले.

मॅक्सीन बर्नसन १९६१ मध्ये प्रथमच भारतात आल्या. त्यांनी दोन वर्षे हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजात इंग्रजी शिकवले. त्यानंतर त्या अमेरिकेत परतल्या व तेथील पेनसिल्व्हानिया विद्यापीठात त्यांना भाषाशास्त्र व भारतीय भाषांमध्ये पीएच. डी. करण्यासाठी फेलोशिप मिळाली.

१९६६ मध्ये डॉ. बर्नसन यांना ‘पश्चिम महाराष्ट्रातील फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता’ या विषयावर काम करण्यासाठी फुलब्राइट-हेज फेलोशिप मिळाली. पुढे त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज कडून भारतात राहून काम पूर्ण करण्यासाठीही फेलोशिप मिळाली. १९७३ मध्ये त्यांची पीएच. डी. पूर्ण झाली.
१९६६ मध्ये डॉ. बर्नसन यांना ‘पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता’ या विषयावर काम करण्यासाठी फुलब्राइट-हेज फेलोशिप मिळाली. पुढे त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज कडून भारतात राहून काम पूर्ण करण्यासाठीही फेलोशिप मिळाली. १९७३ मध्ये त्यांची पीएच. डी. पूर्ण झाली.

भाषाशास्त्रातील संशोधनाबरोबरच डॉ. बर्नसन यांनी त्यांच्या स्नेही जाई निंबकर यांच्यासोबत अमराठी प्रौढांना मराठी शिकवण्यासाठी नऊ पुस्तकांच्या संचावर काम सुरू केले होते. या पुस्तकांमध्ये एक व्याकरणाचे पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश होता. १९७१ पासून त्यांनी दर वर्षाआड अमेरिकेत जाऊन असोसिएटेड कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्रॅम अंतर्गत पुण्यात येऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना स्प्रिंग ओरिएन्टेशन कोर्स मध्ये मराठी शिकवणे सुरू केले.
भाषाशास्त्रातील संशोधनाबरोबरच डॉ. बर्नसन यांनी त्यांच्या स्नेही जाई निंबकर यांच्यासोबत अमराठी प्रौढांना मराठी शिकवण्यासाठी नऊ पुस्तकांच्या संचावर काम सुरू केले होते. या पुस्तकांमध्ये एक व्याकरणाचे पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश होता. १९७१ पासून त्यांनी दर वर्षाआड अमेरिकेत जाऊन असोसिएटेड कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्रॅम अंतर्गत पुण्यात येऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना ‘स्प्रिंग ओरिएन्टेशन कोर्स’मध्ये मराठी शिकवणे सुरू केले.

एकोणीसशेच्या सत्तरच्या दशकाच्या मध्यातून डॉ. बर्नसन यांचा शालेय शिक्षणाकडे कल वाढला. त्या प्रादेशिक भाषा शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरण्याचा पुरस्कार करणारे लेख इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून लिहू लागल्या. त्या मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापकांपैकीही एक होत.

==प्रगत शिक्षण संस्थेची स्थापना==
१९७८ मध्ये डॉ. बर्नसन यांनी आपले अमेरिकन नागरिकत्व रद्द केले व त्या भारतीय नागरिक बनल्या. त्याच वर्षी आपल्या एका मैत्रिणीबरोबर त्यांनी फलटणच्या दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरीत्या शिकवण्यास सुरुवात केली. याच कामाची परिणती पुढे हळूहळू प्रगत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत झाली.

==सन्मान आणि पुरस्कार==
* १९९३ साली डॉ. बर्नसन यांना त्यांच्या भाषा व शिक्षण क्षेत्रातील कामासाठी सातारा येथील अभिजात साहित्य संमेलनात गौरविण्यात आले.
* सामाजिक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करण्यार्‍याव्यक्तींची आंतरराष्ट्रीय संस्था-अशोका फौंडेशनच्या- त्या आजीव सदस्य आहेत.
* आपापल्या कार्यासाठी प्रसिद्ध पावलेल्या महाराष्ट्रीय महिलांच्या जीवनाची ओळख करून देणार्‍या ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातही डॉ. बर्नसन यांचा समावेश आहे.

[[वर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म]]
[वर्ग:सातारा जिल्हा]]
[[वर्ग:मराठी शिक्षणतज्ज्ञ]]

००:३७, ८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

डॉ. मॅक्सीन बर्नसन ( Dr. Maxine Berntsen) (जन्म : ७ ऑक्टोबर, इ.स. १९३५; हयात) या सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापिका होत. कधी फलटण, कधी हैदराबाद तर कधी अमेरिका येथे त्यांचे वास्तव्य असते वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांचे भाषा समृद्धी संशोधनाचे कार्य चालू असते.

डॉ. मॅक्सीन बर्नसन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३५ ला अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातील एस्कनाबा येथे झाला. त्यांचे वडील नॉर्वेच्या तर आई फिनलंडच्या विस्थापित कुटुंबातून आल्या होत्या. मिनिसोटाच्या ऑग्सबर्ग कॉलेजमधून बी. ए. केल्यानंतर त्यांनी तेथील शाळेत एक वर्ष इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर त्यांना न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम्. ए. करण्यासाठी अतिशय प्रतिष्ठित वुडरो विल्सन फेलोशिप मिळाली. पदवी मिळाल्यानंतर डॉ. बर्नसन यांनी आयोवातील डेकोरा येथील ल्यूथर कॉलेजात दोन वर्षे इंग्रजी शिकवले.

मॅक्सीन बर्नसन १९६१ मध्ये प्रथमच भारतात आल्या. त्यांनी दोन वर्षे हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजात इंग्रजी शिकवले. त्यानंतर त्या अमेरिकेत परतल्या व तेथील पेनसिल्व्हानिया विद्यापीठात त्यांना भाषाशास्त्र व भारतीय भाषांमध्ये पीएच. डी. करण्यासाठी फेलोशिप मिळाली.

१९६६ मध्ये डॉ. बर्नसन यांना ‘पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता’ या विषयावर काम करण्यासाठी फुलब्राइट-हेज फेलोशिप मिळाली. पुढे त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज कडून भारतात राहून काम पूर्ण करण्यासाठीही फेलोशिप मिळाली. १९७३ मध्ये त्यांची पीएच. डी. पूर्ण झाली.

भाषाशास्त्रातील संशोधनाबरोबरच डॉ. बर्नसन यांनी त्यांच्या स्नेही जाई निंबकर यांच्यासोबत अमराठी प्रौढांना मराठी शिकवण्यासाठी नऊ पुस्तकांच्या संचावर काम सुरू केले होते. या पुस्तकांमध्ये एक व्याकरणाचे पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश होता. १९७१ पासून त्यांनी दर वर्षाआड अमेरिकेत जाऊन असोसिएटेड कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्रॅम अंतर्गत पुण्यात येऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना ‘स्प्रिंग ओरिएन्टेशन कोर्स’मध्ये मराठी शिकवणे सुरू केले.

एकोणीसशेच्या सत्तरच्या दशकाच्या मध्यातून डॉ. बर्नसन यांचा शालेय शिक्षणाकडे कल वाढला. त्या प्रादेशिक भाषा शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरण्याचा पुरस्कार करणारे लेख इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून लिहू लागल्या. त्या मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापकांपैकीही एक होत.

प्रगत शिक्षण संस्थेची स्थापना

१९७८ मध्ये डॉ. बर्नसन यांनी आपले अमेरिकन नागरिकत्व रद्द केले व त्या भारतीय नागरिक बनल्या. त्याच वर्षी आपल्या एका मैत्रिणीबरोबर त्यांनी फलटणच्या दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरीत्या शिकवण्यास सुरुवात केली. याच कामाची परिणती पुढे हळूहळू प्रगत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत झाली.

==सन्मान आणि पुरस्कार==
  • १९९३ साली डॉ. बर्नसन यांना त्यांच्या भाषा व शिक्षण क्षेत्रातील कामासाठी सातारा येथील अभिजात साहित्य संमेलनात गौरविण्यात आले.
  • सामाजिक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करण्यार्‍याव्यक्तींची आंतरराष्ट्रीय संस्था-अशोका फौंडेशनच्या- त्या आजीव सदस्य आहेत.
  • आपापल्या कार्यासाठी प्रसिद्ध पावलेल्या महाराष्ट्रीय महिलांच्या जीवनाची ओळख करून देणार्‍या ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातही डॉ. बर्नसन यांचा समावेश आहे.

[वर्ग:सातारा जिल्हा]]