"वाशिष्ठी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
या पानावरील सगळा मजकूर काढला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. हिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर असून ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. ती सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर उंचीवरून उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी सैर करत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते.

==वाशिष्टीच्या उपनद्या==
वाशिष्ठीची प्रमुख उपनदी म्हणजे खेडची जगबुडी नदी. दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच पण एका वर्षी तिने हायवे बंद पाडला होता. हिच्यावर दोन मध्यम प्रकल्प आहेत नातूवाडी आणि शिरवली. वाशिष्ठीच्या इतर उपनद्या किंवा नाले म्हणजे नारिंगी, तांबी नदी, धावती नदी, बैतरणी आणि [[शिवनदी]].

==गोड्या पाण्याची नदी==
कोकणात जरी ३००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडत असला तरी तीव्र उतारांमुळे आणि जमिनीच्या रचनेमुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्‍या नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पण वाशिष्ठीचे गोडे पाणी मात्र कधीच कमी नसते. ती सदा भरलेली, वाहणारी असते.

==कोयनेचे पाणी वाशिष्ठीत==
वाशिष्ठी नदीत येणारे पाणी तिचे नाही. हे पाणी सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पातून येते. कोयना धरणाचा विस्तीर्ण शिवसागर जलाशय कोयना १, २ आणि ४ या टप्प्यांतील पाणी साठवतो.. हे पाणी खरे तर आग्नेयेकडे वाहून कोयना नदीतून कृष्णेस मिळायला हवे, पण तसे होऊ नये म्हणून ते अडवून व थेट उलटे वळवून कृष्णा खोर्‍यातून कोकणातील वाशिष्ठी खोर्‍यात टाकले जाते. असे पाणी दर वर्षी १९०० दश लक्ष घन मीटर इतके असते.

==वाशिष्टी खोर्‍यातील निसर्गवैविध्य==
वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. इथे वैविध्याची अचाट रेलचेल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, आणि छोटे नाजुक ओहोळ ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. या खोर्‍यात खारफुटीची जंगले आहेत आणि बिबटे, कोल्हे व अन्य प्राणीही आहेत.

==मगरी==
वाशिष्टी नदीमध्ये मगरी आहेत.

==दाभोळची खाडी==
वाशिष्टी नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथे दाभोळची खाडी आणि दाभोळ बंदर आहे.

[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]

००:४१, ३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. हिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर असून ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. ती सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर उंचीवरून उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी सैर करत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते.

वाशिष्टीच्या उपनद्या

वाशिष्ठीची प्रमुख उपनदी म्हणजे खेडची जगबुडी नदी. दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच पण एका वर्षी तिने हायवे बंद पाडला होता. हिच्यावर दोन मध्यम प्रकल्प आहेत नातूवाडी आणि शिरवली. वाशिष्ठीच्या इतर उपनद्या किंवा नाले म्हणजे नारिंगी, तांबी नदी, धावती नदी, बैतरणी आणि शिवनदी.

गोड्या पाण्याची नदी

कोकणात जरी ३००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडत असला तरी तीव्र उतारांमुळे आणि जमिनीच्या रचनेमुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्‍या नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पण वाशिष्ठीचे गोडे पाणी मात्र कधीच कमी नसते. ती सदा भरलेली, वाहणारी असते.

कोयनेचे पाणी वाशिष्ठीत

वाशिष्ठी नदीत येणारे पाणी तिचे नाही. हे पाणी सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पातून येते. कोयना धरणाचा विस्तीर्ण शिवसागर जलाशय कोयना १, २ आणि ४ या टप्प्यांतील पाणी साठवतो.. हे पाणी खरे तर आग्नेयेकडे वाहून कोयना नदीतून कृष्णेस मिळायला हवे, पण तसे होऊ नये म्हणून ते अडवून व थेट उलटे वळवून कृष्णा खोर्‍यातून कोकणातील वाशिष्ठी खोर्‍यात टाकले जाते. असे पाणी दर वर्षी १९०० दश लक्ष घन मीटर इतके असते.

वाशिष्टी खोर्‍यातील निसर्गवैविध्य

वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. इथे वैविध्याची अचाट रेलचेल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, आणि छोटे नाजुक ओहोळ ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. या खोर्‍यात खारफुटीची जंगले आहेत आणि बिबटे, कोल्हे व अन्य प्राणीही आहेत.

मगरी

वाशिष्टी नदीमध्ये मगरी आहेत.

दाभोळची खाडी