"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
विस्तार केला
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
'''सर्वात महान भारतीय''' ([[इंग्रजी]]: [[:en:The Greatest Indian|The Greatest Indian]]) हे रिलायंस आऊटलूक चे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षणाद्वारे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून घोषित झाले आहे.
'''सर्वात महान भारतीय''' ([[इंग्रजी]]: [[:en:The Greatest Indian|The Greatest Indian]]) हे रिलायंस आऊटलूक चे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षणाद्वारे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून घोषित झाले आहे.

== सर्वात महान भारतीय ==
{{main|सर्वात महान भारतीय}}
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘[[सर्वात महान भारतीय]] कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी २०१२ मध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठय़ा सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. उत्तर आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.

सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या 100 नामवंतांची यादी करून त्यातील [[सर्वात महान भारतीय]] कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. [[दूरध्वनी]], [[मोबाईल]] व [[इंटरनेट]]द्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील 15 शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये बाबासाहेबांनंतर [[एपीजे अब्दुल कलाम]], [[वल्लभभाई पटेल]], [[जवाहरलाल नेहरू]], [[मदर तेरेसा]], [[जे.आर.डी. टाटा]], [[इंदिरा गांधी]], [[सचिन तेंडुलकर]], [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि [[लता मंगेशकर]] यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.

तीन सर्वेक्षणातील निष्कर्ष तसे वेगळे आहेत. सर्वसामान्य लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविलं. लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभभाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या सर्वेक्षणात जवळपास दोन के ची लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या वाहिन्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक '''19 लाख 91 हजार 734''' मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल '''13 लाख 74 हजार''' मते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे 9,921 मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींच्या समकालीन इतर काही नेते गांधीपेक्षाही महान होते, असा युक्तिवाद केला जात गेला. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अतिशय कडाडून विरोध होता. ”मी आदर्शाचा पूजक नाही. उलट ते मोडित काढणे यावर मी विश्वास ठेवतो,” असे ते सांगतं. ”गांधी आणि जिनांचा उदोउदो करण्यापेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.) याशिवाय भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, आकलन, प्राथमिकता, वर्णव्यवस्थेचा प्रभाव या गोष्टीही आपल्याला कुठल्या एका नावावर महानतेचा शिक्का मारण्यास परवानगी देत नाही. मात्र कुठल्याही वैयक्तिक पराक्रमापेक्षा ज्याच्या कर्तृत्वाने लाखो-करोडो
माणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि ज्या माणसाने देशाला भक्कम करण्यातही आपले योगदान दिले, अशा माणसाला निश्चितपणे महान म्हणावे लागेल. या निकषामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अगदी शंभर टक्के फिट बसतं. जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, गांधी अशी अनेक नावं घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एका धर्मातराच्या निर्णयाने त्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता केली. त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया फक्त बाबासाहेबांना साध्य झाली आहे. विशेष म्हणजे हे करताना आपल्या कृतीतून देश मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. नऊ वर्षापूर्वी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवाद सांगणारा धर्म स्वीकारून देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा एका कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र समाजातील सार्‍या उपेक्षित घटकांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. निव्वळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील शोषित, पीडितांना लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. बाबासाहेबांची इतर कर्तबगारी खूप मोठी आहे. मात्र त्यांचा हा पराक्रमच त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो. दुसरी एवढी सार्थ निवड असूच शकत नाही. दि गेट्रेस्ट इंडियन निवडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 नामवंत भारतीयांना नामांकन देण्यात आले होते.भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा व भक्तीचा मोठा प्रभाव आहे. इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा, पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग होतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

===सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते===
1. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] – 19,91,734

2. [[एपीजे अब्दुल कलाम]] – 13,74,431

3. [[वल्लभभाई पटेल]] – 5,58,835

4. [[अटलबिहारी वाजपेयी]] – 1,67,378

5. [[मदर तेरेसा]] – 92,645

6. [[जे.आर.डी. टाटा]] – 50,407

7. [[सचिन तेंडुलकर]] – 47,706

8. [[इंदिरा गांधी]] – 17,641

9. [[लता मंगेशकर]] – 11,520

10. [[जवाहरलाल नेहरू]] – 9,921

१८:०२, २० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सर्वात महान भारतीय (इंग्रजी: The Greatest Indian) हे रिलायंस आऊटलूक चे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षणाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून घोषित झाले आहे.

सर्वात महान भारतीय

भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी २०१२ मध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठय़ा सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. उत्तर आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.

सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या 100 नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईलइंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील 15 शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, जे.आर.डी. टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.

तीन सर्वेक्षणातील निष्कर्ष तसे वेगळे आहेत. सर्वसामान्य लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविलं. लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभभाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या सर्वेक्षणात जवळपास दोन के ची लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या वाहिन्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक 19 लाख 91 हजार 734 मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल 13 लाख 74 हजार मते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे 9,921 मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींच्या समकालीन इतर काही नेते गांधीपेक्षाही महान होते, असा युक्तिवाद केला जात गेला. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अतिशय कडाडून विरोध होता. ”मी आदर्शाचा पूजक नाही. उलट ते मोडित काढणे यावर मी विश्वास ठेवतो,” असे ते सांगतं. ”गांधी आणि जिनांचा उदोउदो करण्यापेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.) याशिवाय भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, आकलन, प्राथमिकता, वर्णव्यवस्थेचा प्रभाव या गोष्टीही आपल्याला कुठल्या एका नावावर महानतेचा शिक्का मारण्यास परवानगी देत नाही. मात्र कुठल्याही वैयक्तिक पराक्रमापेक्षा ज्याच्या कर्तृत्वाने लाखो-करोडो माणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि ज्या माणसाने देशाला भक्कम करण्यातही आपले योगदान दिले, अशा माणसाला निश्चितपणे महान म्हणावे लागेल. या निकषामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अगदी शंभर टक्के फिट बसतं. जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, गांधी अशी अनेक नावं घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एका धर्मातराच्या निर्णयाने त्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता केली. त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया फक्त बाबासाहेबांना साध्य झाली आहे. विशेष म्हणजे हे करताना आपल्या कृतीतून देश मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. नऊ वर्षापूर्वी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवाद सांगणारा धर्म स्वीकारून देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा एका कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र समाजातील सार्‍या उपेक्षित घटकांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. निव्वळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील शोषित, पीडितांना लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. बाबासाहेबांची इतर कर्तबगारी खूप मोठी आहे. मात्र त्यांचा हा पराक्रमच त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो. दुसरी एवढी सार्थ निवड असूच शकत नाही. दि गेट्रेस्ट इंडियन निवडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 नामवंत भारतीयांना नामांकन देण्यात आले होते.भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा व भक्तीचा मोठा प्रभाव आहे. इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा, पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग होतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 19,91,734

2. एपीजे अब्दुल कलाम – 13,74,431

3. वल्लभभाई पटेल – 5,58,835

4. अटलबिहारी वाजपेयी – 1,67,378

5. मदर तेरेसा – 92,645

6. जे.आर.डी. टाटा – 50,407

7. सचिन तेंडुलकर – 47,706

8. इंदिरा गांधी – 17,641

9. लता मंगेशकर – 11,520

10. जवाहरलाल नेहरू – 9,921