"रोझ व्हॅली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रोझ व्हॅली ही पश्चिम बंगालमध्ये चालत असलेली एक चिट फंड कंपनी आहे....
(काही फरक नाही)

००:०७, १८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

रोझ व्हॅली ही पश्चिम बंगालमध्ये चालत असलेली एक चिट फंड कंपनी आहे. खातेदारांना फसवून त्यांचा पैसा हडप करणार्‍या या कंपनीची इ.स. २०११ सालापासून चौकशी चालू होती. अखेर २०१६ सालच्या अखेरीस या कंपनीचे कामकाज बंद पाडून सरकारने संबंधितांना अटक केली.

रोझ कंपनीची सुरुवात

काजल कुंडू या कलकत्त्यातील उद्योजकाने इ.स. १९९७मध्ये रोझ रिझॉर्ट्‌स अॅन्ड प्लँटेशन (गुलाबशेती) नावाची कंपनी स्थापन केली. इ.स. २००३मध्ये काजल यांची पत्‍नी आणि मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर काजल यांचे धाकटे बंधू गौतम यांनी ही कंपनी ताब्यात घेतली.

त्यानंतर कंपनीने ट्रॅक बदलला. गुंतवणूकदारांना जमिनी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मोठ्या परताव्याचे आमिष, अनेक बड्या लोकांची गुंतवणूक यामुळे असंख्य सामान्य गुंतवणूकदारांनी अक्षरशः आयुष्यभराची सारी कमाई रोझ व्हॅलीमध्ये गुंतवली. त्यांच्यामध्ये पश्चिम बंगाल, .बिहार, ओरिसा आणि आसामसहित इतर ईशान्य भारतातील गुंतवणूकदारांची संख्या मोठी होती. कंपनीचा तपास करताना असे आढळले की, कंपनी गुंतवणूकदारांना १२ ते १७.५ टक्के व्याज देणारी सभासदत्व योजना राबवीत होती. या योजनेत २२ लाख लोकांनी एकूण १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.