"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जगातील विषेशत भारतातील महत्त्वाचा सण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती' लेख/...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:४८, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस १४ एप्रिल ला सणाच्या रूपात भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो.[१] या दिवसाला समता दिन आण 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो, कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समतेचे के प्रतिक आणि ज्ञानाचे प्रतिक म्हटलं जातं. बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचे आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि त्यांच्या अतिशय प्रकांड विद्वत्तासंपन्न म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ हि त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

बाबासाहेबांच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दीक्षास्थळ दीक्षाभूमी, समाधी स्थळ चैत्यभूमी, सार्वजनिक ठिकाणे, शाळा -महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील 55 पेक्षा अधिक देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते.

गुगलने बाबासाहेबांच्या 124 वी जयंती 2015 ला आपल्या 'गुगल डुडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले आहे.[२][३][४] हे गुगल डुडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ "B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle". The Telegraph. 9 January 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday". The Times of India. 9 January 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/