"किवी (फळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्...
(काही फरक नाही)

२३:५१, २१ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनमध्ये याला ‘राष्ट्रीय फळ’ म्हणून संबोधले जाते. याच झाडाला प्रथम चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे ‘अ‍ॅक्टीनिडिया डेलिसिओसा’ (Actinidia deliciosa).

समशीतोष्ण हवामानात या वनस्पतीची वाढ चांगल्या तर्‍हेने होते. चीन, न्यूझीलंड या देशाप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्किम, उत्तर प्रदेश, मेघालय, निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात ह्या किवीचे उत्पादन घेतले जाते.

किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखी एक वेल असतो. एखाद्या आधारावर या वेली वाढतात. त्यांना फुलेही येतात. नैसर्गिकरीत्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षून घेणारी नसतात. पण या फळाचे उत्पन्‍न घेणारे शेतकरी या फुलांचे परागकण वाफारून फुलांच्या आणि झाडांच्या प्रजजनास मदत करतात.

ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात. जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी ८ पोळी असे प्रमाण असते. झाड फुलांनी बहरले की माश्या-माश्यांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेपोटीच ‘परागीकरण’ घडविले जाते. वेलींवर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो. किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात. जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते..

किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते. शरीराला आवश्यक असणारी ‘अँटीऑक्सिड्न्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.