"हरदास एल.एन." च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३९ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
आणि
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Babu_hardas.jpg|इवलेसे]]
{{Infobox person|name=Babu L.N. Hardas|image=|alt=|caption=|birth_date={{birth date|1904|01|06}}|birth_place=[[Kamthi]]|death_date={{Death date and age|1939|01|12|1904|01|06}}|death_place=|nationality=|spouse=Sahubai|other_names=|known_for=Pioneer of the greeting phrase ''[[Jai Bhim]]''|occupation=}}

'''हरदास लक्ष्मणराव नगराळे''' उपाख्य '''बाबू एल. एन. हरदास''' (१९०४-१९३९) हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक [[दलित]] पुढारी व समाजसुधारक होते. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे]] कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना [[जय भीम]] या शब्दाचा अभिवादानासाठी उपयोग करण्याच्या प्रथेचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या [[स्वतंत्र मजूर पक्ष (भारत)|स्वतंत्र मजूर पक्षाचे]] मध्य प्रांताचे सामान्य सचिव होते.

००:२५, १३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

हरदास एल.एन.

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू एल. एन. हरदास (१९०४-१९३९) हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना जय भीम या शब्दाचा अभिवादानासाठी उपयोग करण्याच्या प्रथेचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सामान्य सचिव होते.

जीवन

बाबू हरदास यांचा जन्म कामठी येथे जानेवारी ६, १९०४ रोजी एका महार कुटुंबात झाला.[१] त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यात कारकून होते. बाबू हरदास यांची मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले. त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला.[१]

त्या काळच्या प्रथांनुसार, वयाच्या सोळाव्या वर्षी १९२० मध्ये बाबू हरदास यांचा विवाह साहूबाई यांच्याबरोबर झाला. बाबू हरदासांचे आयुष्य त्यांच्या समाजबांधवांमध्ये जागृती करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच जानेवारी १२, १९३९ त्यांचा मृत्यू झाला.[२][३]

संदर्भ

  1. ^ a b पासवान (२००२) पृ. २५३
  2. ^ पासवान (२००२) पृ. २५५
  3. ^ मून (२००१) पृ. ५०