"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Buddha
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
बुद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७: ओळ ३७:
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.


== बौद्ध धर्म ==
== महाभिनिष्क्रमण ==
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास [[इ.स.पू. ६]] ते [[इ.स. ६]] ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. [[त्रिपीटक]]ाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा [[विहार]], [[स्तूप]], [[मठ]], व [[गुफा]] ([[लेणी]]) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि विशेषत: धार्मिक बाजूवर बौद्ध धर्माची खोलवर व न पूसणारी अशी छाप पडलेली आहे.
सिद्धार्थ गौतमाला जीवनातील दु:खाचा विचार भेडसावत होता. मानवी आयुष्यातील दु:खाचे मुळ काय, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आणि ‘सत्या’च्या शोधण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला. या घटनेस ‘महाभिनिष्क्रमण’ असे म्हणतात.


== ज्ञानप्राप्ती ==
== ज्ञानप्राप्ती ==

२३:०५, १४ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

महाकारूणिक तथागत भगवान बुद्ध

सारनाथ मधील तथागत बुद्धांची प्रतिमा, ४ थे शतक
मूळ नाव सिद्धार्थ, गौतम, शाक्यमुनी
जन्म इ.स.पू. ५६३
लुंबिनी, नेपाळ
निर्वाण इ.स.पू. ४८३
कुशीनगर, मध्यप्रदेश, भारत
भाषा पाली
कार्य महान बौद्ध धर्माचे संस्थापक
बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार
प्रसिद्ध वचन अत्त दिप् भव्
संबंधित तीर्थक्षेत्रे लुंबिनी
गया
कुशीनगर
सारनाथ
वडील राजा शुद्धोधन
आई महाराणी महामाया
पत्नी यशोधरा
अपत्ये राहुल
विशेष माहिती जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व
जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती
जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी

तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होय. बुद्धांचे मुळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. राहूल नावाचा त्यांना पुत्ररत्न ही झाले.

बौद्ध मतानुयायी लोक यांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.

आज सर्वच खंडात भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी आहे.

तथागत बुद्ध हे केवळ सर्वात श्रेष्ठ भारतीयच नसून ते संपूर्ण जगातही पहिल्या सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत. इंग्लडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापिठाने मागील १० हजार वर्षामधील अशा टॉप १०० जगातील विश्वमानवांची यादी तयार केली ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापिठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांचे ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.

बौद्ध धर्म

ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपीटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व गुफा (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि विशेषत: धार्मिक बाजूवर बौद्ध धर्माची खोलवर व न पूसणारी अशी छाप पडलेली आहे.

ज्ञानप्राप्ती

गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

धम्मचक्र प्रवर्तन

ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वत: ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

बौद्ध धर्माची शिकवण

भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितले.

चार आर्यसत्ये

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
१. दु:ख :- मानवी जीवन हे दु:खमय आहे.
२. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण आहे.
३. दु:ख निरोध :-दु:खाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
४. प्रतिपद् :- दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

महान बौद्ध विद्वान व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - दु:ख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.

अष्टांग मार्ग

महाकारूणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.

अष्टांग मार्ग

अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.

१) सम्यम दृष्टी :- निसर्ग नियमा विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
२) सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
३) सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
४) सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
५) सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
६) सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
७) सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
८) सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.


दहा पारमिता

दहा पारमीता ह्या शिल मार्ग होय.

१) शिल  :- शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
२) दान  :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
३) उपेक्षा  :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
४) नैष्क्रिम्य  :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य  :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
६) शांति  :- शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
७) सत्य  :- सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
८) अधिष्ठान  :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
९) करुणा  :- सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
१०) मैञी  :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रुविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.

तथागत बुद्धांची शिकवण

१) मूर्खांची संगती करु नका.
२) विद्वानांची संगती करा.
३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
४) अनुकूल देशात निवास करा.
५) चांगली कामे करा.
६) चित्तास स्थिर ठेवा.
७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
🌀८) विद्वान व्हा.
🌀९) संयमी राहा.
🌀१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
🌀११) मातापित्याची सेवा करा.
🌀१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
🌀१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
🌀१४) दानधर्म करा.
🌀१५) धम्माचरण करा.
🌀१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
🌀१७) निर्दोष कर्मे करा.
🌀१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
🌀१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
🌀२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
🌀२१) गौरवाची भावना जोपासा.
🌀२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
🌀२३) क्षमाशील असा.
🌀२४) संतुष्ट असा.
🌀२५) कृतज्ञ असा. लीन असा.
🌀२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
🌀२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
🌀२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
🌀२९) ब्रम्हचारी राहा.
🌀३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
🌀३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
🌀३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
🌀३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
🌀३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा. 🌷-नमो बुद्धाय🌷 💐

पंचशील

१) मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
२) मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
३) मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
५) मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तुंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.


या बौद्ध् तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.

जीवनपट

गांधार बुद्ध. इ.स.१-२ रे शतक, टोक्यो,जपान राष्ट्रीय संग्रहालय

सिद्धार्थ गौतम विषयीच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मय होय. बुद्ध आणि त्याचे अनुयायी प्रत्येक वर्षी चार महिने त्याच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि मग एका शतकानंतर, अनुयायांनी एक बौद्ध धम्म परिषद (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिला. उपलब्ध पुराव्यानुसार, दुसर्‍या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धाची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.

एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतमबुधाच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमाध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.

जन्म

[[लुंबिनी]], नेपाळ येथील महामाया निवासस्थान
लुंबिनीमध्ये बुद्धांचा जन्म दर्शविणारे देवळातील भित्तिचित्रे चित्र
युवराज सिद्धार्थ गौतमबोधिसत्त्वरूपात , मुशी गुईमेट्, पॅरिस

सिद्धार्थाचे जन्मस्थळ- लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी , सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. त्याची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध धर्मीय वाङमयानुसार, त्याचा पिता राजा शुद्धोदन शाक्य या कोशल प्रांतात निवास करणारा राजा होता. लोक कथेनुसार शुद्धोदन हा सूर्यवंशीय इक्ष्वाकू घराण्याचा वंशज होता. राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसक म्हणून साजरा करतात. सिद्धार्थ जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले.

प्रारंभिक आयुष्य आणि विवाह

गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार जेथे झाला ते गंगा नदीचे खोरे ह्याच भागात गौतम बुद्धांनी आपले प्रारंभिक भ्रमण केले.
सिद्धार्थ गौतम ह्यांच्या महापरिनिर्वाणाचे छायाचित्र,[१]
युवराज सिद्धार्थ गौतम आपले केशकर्तन करून घेत आहेत,त्यानंतर ते योगी बनले . बोरोबुदुर, ८ वे शतक.

राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.

सोळावे वर्ष प्राप्त झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र. सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.

गृहत्याग आणि तपस्या

लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या -चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खर्‍या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्‍य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या सार्‍या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या मर्यादित जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंथक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते.

सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.

ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणार्‍या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला.

सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली.या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला.

सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करुनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ(पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले

बुद्ध संस्कृती

ही संस्कृती जगाचे विविध देश जसे नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड ब्रम्हदेश येथे पसरली.तेथे गौतम बुद्धाचे अनेक पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा,ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा,आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत.पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे.ते पुण्यातील 'बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थे'तर्फे चालविले जाते.

सोन्याची बुद्ध मूर्ती

या मूर्तीचा शोध नंदकिशोर भालेराव याने लावला

पुस्तके

गौतम बुद्ध आणि त्याचा धर्म यांविषयी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे:

संदर्भ

  1. ^ Guimet.fr

बाह्य दुवे