"भारतरत्‍न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
बाबासाहेब
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२२: ओळ १२२:
| ([[इ.स. १८९१|१८९१]]-[[इ.स. १९५६|१९५६]])
| ([[इ.स. १८९१|१८९१]]-[[इ.स. १९५६|१९५६]])
| [[इ.स. १९९०|१९९०]]
| [[इ.स. १९९०|१९९०]]
| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्‍ज्ञ, जातिव्यवस्थे विरूद्ध प्रखर लढा, राजकीय नेते
| मानवी हक्कांचे कैवारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्‍ज्ञ, जातिव्यवस्थे विरूद्ध प्रखर लढा, राजकीय नेते, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडित, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, [[बौद्ध धर्म]] पुनरूत्थानी, भारताचे पहिले कायदामंत्री
|-
|-
| २३.
| २३.
ओळ १२९: ओळ १२९:
| ([[इ.स. १९१८|१९१८]]-[[इ.स. २०१३|२०१३]])
| ([[इ.स. १९१८|१९१८]]-[[इ.स. २०१३|२०१३]])
| १९९०
| १९९०
| वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते
| वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
|- bgcolor=#edf3fe
|- bgcolor=#edf3fe
| २४.
| २४.

१९:१४, १ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

भारत रत्‍न
भारतरत्न पदक
पुरस्कार माहिती
प्रकार नागरिक
वर्ग सामान्य
स्थापित १९५४
प्रथम पुरस्कार वर्ष १९५४
एकूण सन्मानित >४५
सन्मानकर्ते भारत सरकार
रोख पुरस्कार शून्य
सुलट पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा श्ब्द
उलट भारताचे राजचिन्ह
प्रथम पुरस्कारविजेते सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४)

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञानतंत्रज्ञान, क्रीडा, कारखानदारी या क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.

२ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. [ संदर्भ हवा ]

भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ प्रदान करण्यात आला होता.[ संदर्भ हवा ] सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.

पुरस्काराचे स्वरूप

सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात २०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणार्‍यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते. (Bharat Ratna recipients rank seventh in the Indian order of precedence, but are constitutionally prohibited from using the award name as a title.)

हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

सन्मानित व्यक्तींची यादी

क्रमांक नाव चित्र जन्म-मृत्यू पुरस्कृत वर्ष क्षेत्र
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण चित्र:चंद्रशेखर वेंकट रामन.jpg (१८८८-१९७०) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या चित्र:SirMV (1).png (१८६१-१९६२) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना
जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते
गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री

व भारताचे दुसरे गृहमंत्री

धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक
डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक
१० पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक
११ डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती
१२ डॉ. झाकिर हुसेन चित्र:DrZakirHusain.jpg (१८९७-१९६९) १९६३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती
१३ महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे चित्र:पांडुरंग वामन काणे.jpg (१८८०-१९७२) १९६३ शिक्षणप्रसारक
१४ लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) चित्र:1736 Lal Bahadur Shastri.jpg (१९०४-१९६६) १९६६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान
१५ इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
१६. वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५ कामगार युनियन पुढारी व भारताचे चौथे राष्ट्रपती
१७. के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
१८ मदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८० ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक
२०. खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) चित्र:MGR with K Karunakaran (cropped).jpg (१९१७-१९८७) १९८८ चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
२२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९० मानवी हक्कांचे कैवारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्‍ज्ञ, जातिव्यवस्थे विरूद्ध प्रखर लढा, राजकीय नेते, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडित, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, बौद्ध धर्म पुनरूत्थानी, भारताचे पहिले कायदामंत्री
२३. नेल्सन मंडेला (१९१८-२०१३) १९९० वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
२४. राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१ भारताचे सातवे पंतप्रधान
२५. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री
२६. मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान
२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री
२८. जे.आर.डी. टाटा चित्र:2JRD TATA PHOTO.jpg (१९०४-१९९३) १९९२ उद्योजक
२९. सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२ बंगाली चित्रपट निर्माते
३०. ए.पी.जे. अब्दुल कलाम ( १९३१-२०१५) १९९७ भारताचे ११वे राष्ट्रपती
३१. गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान
३२. अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर) (१९०६-१९९५) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
३३. एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८ कर्नाटक शैलीतील गायिका
३४. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री
३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (१९०२-१९७९) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
३६. रवी शंकर (१९२०)-२०१२) १९९९ प्रसिद्ध सितारवादक
३७. अमर्त्य सेन (१९३३ - हयात) १९९९ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) (१८९०-१९५०) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री
३९. लता मंगेशकर (१९२९ - हयात) २००१ पार्श्वगायिका
४०. बिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१ शहनाईवादक
४१. भीमसेन जोशी चित्र:Pandit Bhimsen Joshi.jpg (१९२२-२०११) २००८ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
४२. सी.एन.आर.राव[१][२] (१९३४ - हयात) २०१४
शास्त्रज्ञ
४३. सचिन तेंडुलकर[१][२] (१९७३ - हयात) २०१४
क्रिकेटपटू
४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)[१][२] चित्र:Malaviya.jpg (१८६१ - १९४६) २०१५
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक
४५. अटलबिहारी वाजपेयी[१][२] (१९२४ - हयात) २०१५
भारताचे पंतप्रधान, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ a b c d . New Delhi: Hindustan Times. 16 November 2013 http://www.hindustantimes.com/india-news/sachinretirement/sachin-first-sportsperson-to-win-country-s-highest-civilian-honour-bharat-ratna/article1-1151983.aspx. 16 November 2013 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d . Prime Minister's Office. 16 November 2013 http://pmindia.nic.in/press-details.php?nodeid=1748. 16 November 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)