"चैत्यभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चैत्यभूमी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:११, ११ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

चैत्यभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाले होते त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मुंबई येथे आणण्यात आले. दि. ७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई मधील दादर, चैत्यभूमी येथे बौद्ध पद्धतीने १५ ते २० लक्ष अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. अत्यंसंस्कारापूर्वी एक अद्भूत घटना घडली त्यावेळी १० लक्ष लोकांनी आपल्या महान उद्धारक नेत्याला स्मरूण बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. जागतिक इतिहासात हे एकमेव उदाहरण आहे की एखाद्या नेत्यावरील आसिम विश्वासामुळे व श्रद्धेमुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी या महामानवाने दिलेल्या धम्माचा स्विकार केला.

दरवर्षा चैत्यभूमी येथे "भीम जयंती", "धर्मचक्रप्रवर्तन दिन" आणि "महापरिनिर्वाण दिन" या महत्त्वपूर्ण दिवसांना १५ लक्ष आंबेडकरवादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे चैत्यभूमी मध्ये बाबासाहेबांना अभिवादन करणारे पहिले पंतप्रधान ठरले.