"शकुंतला रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
२५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली '''शकुंतला रेल्वे''' ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची लाइफलाइन होती. [[विदर्भ|विदर्भातील]] [[मूर्तिजापूर]] ते [[यवतमाळ]] या मार्गावर, ‘क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनी’ या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन ([[कारंजा लाड]]), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशने होती.
२५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली '''शकुंतला रेल्वे''' ही अनेक वर्ष वर्‍हाडवासीयांची लाइफलाइन होती. [[विदर्भ|विदर्भातील]] [[मूर्तिजापूर]] ते [[यवतमाळ]] या मार्गावर, ‘क्लिक-निक्सन अॅन्ड कंपनी’ या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन ([[कारंजा लाड]]), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशने होती.

ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च तेव्हढी होती.
ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च तेवढी होती.

क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी असे झाले होते) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील १०० वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला होता. त्यामुळे इ.स. २००३ पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. त्यामुळे स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे त्या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची रक्कम देत असे.
क्लिक-निक्सन अॅन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी असे झाले होते CPRC) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील १०० वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला होता. त्यामुळे इ.स. २००३ पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. शकुंतला ज्यावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे, त्यामुळे भारतीय रेल्वेलाच या विदेशी कंपनीला काही रक्कम द्यावी लागे. स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे सुरुवातीला त्या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची एक कोटी रुपयांची रक्कम देत असे. मात्र गाडी चालवताना उत्पन्न नावापुरतेच आणि देखभालीचा खर्च जास्त. त्यामुळे मध्य रेल्वेने संबधित कंपनीला प्रत्यक्ष रक्कम न देता ती रक्कम देखभालीसाठी खर्च करणे सुरू केले होते.

वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वऱ्हाडवासीयांना आपलेसे केले. त्यांच्या प्रेमात न्हाऊन अंगाखांद्यावर प्रवासी घेऊन किती वर्षे आपण धावतो आहोत, हे तिचे तिलाही कळले नसावे. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती.
वर्‍हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वर्‍हाडवासीयांना आपलेसे केले. त्यांच्या प्रेमात न्हाऊन अंगाखांद्यावर प्रवासी घेऊन किती वर्षे आपण धावतो आहोत, हे तिचे तिलाही कळले नसावे. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती.

या रेल्वेने, [[यवतमाळ]]-[[मूर्तिजापूर]] या ११४ किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंतचे ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १०५ रुपये घेते.
या रेल्वेने, [[यवतमाळ]]-[[मूर्तिजापूर]] या ११४ किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंतचे ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १०५ रुपये घेते.
ओळ १३: ओळ १३:
आर्थिक दृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली, ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटोकाट प्रयत्‍न चालू आहे. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावते. असाच प्रकार [[मूर्तिजापूर]]-[[अचलपूर]] रेल्वेमार्गाबाबत झाला आहे. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नाही, आणि कहर म्हणजे त्या स्टेशनांवरील बहुतेक कर्मचारी हलविण्यात आले आहेत.

==शकुंतला देशमुख==
शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आजवर स्वर्गीय सुदामकाका देशमुख, उषा चौधरी, माजी खासदार व राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रा.सू. गवई, अनंत गुढे या सर्व माजी खासदारांनी सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव देऊन प्रयत्नही केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
दर्यापूरचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्‍नी शकुंतलाबाई देशमुख यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचे सांगण्यात येते. देशमुखांचा दर्यापुरात मोठा वाडा होता. स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते त्या वाड्यावर येत. अमरावतीचे माजी खासदार व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख हेदेखील देशमुखांकडे या वाड्यावर यायचे. आणीबाणीच्या काळात ते या ठिकाणी काही काळ आश्रयाला होते. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या.

१ ऑगस्ट २०१० साली शकुंतला देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी या लोहमार्गाच्या विकासासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर अशी प्रवास परिक्रमा या गाडीने आयोजित केली होती.

==शकुंतलाची वैशिष्ट्ये==
यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही एकमेव गाडी आहे. अन्य कोणतीही गाडी यवतमाळवरून सुटत नाही किंवा यवतमाळवरून जातही नाही. त्यामुळे ब्रिटिश काळापासून या एका गाडीसाठी यवतमाळ स्थानकाचा संसार सुरू आहे.

या गाडीचा वेग इतका कमी असतो की कुणीही धावत्या गाडीत चढू वा उतरू शकतो. 'हात दाखवा एसटी थांबेल', अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. शकुंतला एक्स्प्रेसने ही परंपरा फार पूर्वीपासून सांभाळली आहे. गाडी येताना पाहून कुणी हात दाखवला तर त्याला घेऊनच मग ही गाडी पुढे निघते. तिकीट काढलेच पाहिजे असेही नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठी असते.

प्रवासाची अन्य साधने नसणार्‍या त्या काळात या गाडीने लोकांच्या थेट हृदयात जागा घेतली. लोक बकर्‍या, कोंबड्यांसह या गाडीने प्रवास करायचे. आजही करतात. प्रवाशी खाली पडणार नाही असा वेग या गाडीचा असल्याने ज्यांना डब्यात जागा मिळाली नाही ते टपावर चढून बसायचे.

रेल्वे फाटक आले की, लोको पायलट गाडी थांबवतो. फाटक लावून घेतो. गाडीने फाटक पार केले की मग पुन्हा उतरून रेल्वे फाटक उघडतो व त्यानंतर गाडी पुढे निघते, असेही या गाडीबद्दल सांगितले जाते.

शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आजवर सुदामकाका देशमुख, उषा चौधरी, माजी खासदार व राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रा.सू. गवई, अनंत गुढे या सर्व माजी खासदारांनी सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव देऊन प्रयत्‍नही केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=131230:2011-01-22-15-28-41&Itemid=1
| दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=131230:2011-01-22-15-28-41&Itemid=1
| शीर्षक =शकुंतला रेल्वे झाली भूमीहीन{{मृत दुवा}}
| शीर्षक =शकुंतला रेल्वे झाली भूमीहीन{{मृत दुवा}}
| भाषा = मराठी
| भाषा = मराठी
| ॲक्सेसदिनांक = १० एप्रिल, २०१२
| ॲक्सेसदिनांक = १० एप्रिल, २०१२
}}</ref>
}}</ref>

==ब्रॉडगेजीकरण==
ह्या दोन्ही रेल्वेगाड्या बंद झाल्या असता तर [[मूर्तिजापूर]] सोडले तर बाकी सारी गावे रेल्वेच्या नकाशावरून कायमची गायब झाली असती. परंतु, भारत सरकारने ऑगस्ट २०१६मधे दीड हजार कोटी मंजूर करून नॅरोगेजवर धावणारी 'शकुंतला' ब्रॉडगेजवर आणण्याचा प्रस्ताव आणला आहे.

ह्या दोन्ही रेल्वे बंद झाल्यावर, [[मूर्तिजापूर]] सोडले तर बाकी सारी गावे रेल्वेच्या नकाशावरून कायमची गायब होतील.
==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

०५:३२, १९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

२५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वर्‍हाडवासीयांची लाइफलाइन होती. विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर, ‘क्लिक-निक्सन अॅन्ड कंपनी’ या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशने होती.

ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च तेवढी होती.

क्लिक-निक्सन अॅन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी असे झाले होते CPRC) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील १०० वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला होता. त्यामुळे इ.स. २००३ पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. शकुंतला ज्यावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे, त्यामुळे भारतीय रेल्वेलाच या विदेशी कंपनीला काही रक्कम द्यावी लागे. स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे सुरुवातीला त्या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची एक कोटी रुपयांची रक्कम देत असे. मात्र गाडी चालवताना उत्पन्न नावापुरतेच आणि देखभालीचा खर्च जास्त. त्यामुळे मध्य रेल्वेने संबधित कंपनीला प्रत्यक्ष रक्कम न देता ती रक्कम देखभालीसाठी खर्च करणे सुरू केले होते.

वर्‍हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वर्‍हाडवासीयांना आपलेसे केले. त्यांच्या प्रेमात न्हाऊन अंगाखांद्यावर प्रवासी घेऊन किती वर्षे आपण धावतो आहोत, हे तिचे तिलाही कळले नसावे. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती.

या रेल्वेने, यवतमाळ-मूर्तिजापूर या ११४ किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंतचे ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १०५ रुपये घेते.

अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घेते. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. या एवढ्या वर्षांत या शकुंतलेत काही बदल झाले नाहीत. पूर्वी तीन डबे होते, पुढे ती संख्या पाचवर गेली. १९९४ पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. (ते इंजिन आता पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते.) १५ एप्रिल १९९४ पासून गाडीला डिझेल इंजिन लागले. मात्र, तिच्या वेगात काहीही बदल झालेला नाही.

आर्थिक दृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली, ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटोकाट प्रयत्‍न चालू आहे. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावते. असाच प्रकार मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाबाबत झाला आहे. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नाही, आणि कहर म्हणजे त्या स्टेशनांवरील बहुतेक कर्मचारी हलविण्यात आले आहेत.

शकुंतला देशमुख

दर्यापूरचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्‍नी शकुंतलाबाई देशमुख यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचे सांगण्यात येते. देशमुखांचा दर्यापुरात मोठा वाडा होता. स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते त्या वाड्यावर येत. अमरावतीचे माजी खासदार व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख हेदेखील देशमुखांकडे या वाड्यावर यायचे. आणीबाणीच्या काळात ते या ठिकाणी काही काळ आश्रयाला होते. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या.

१ ऑगस्ट २०१० साली शकुंतला देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी या लोहमार्गाच्या विकासासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर अशी प्रवास परिक्रमा या गाडीने आयोजित केली होती.

शकुंतलाची वैशिष्ट्ये

यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही एकमेव गाडी आहे. अन्य कोणतीही गाडी यवतमाळवरून सुटत नाही किंवा यवतमाळवरून जातही नाही. त्यामुळे ब्रिटिश काळापासून या एका गाडीसाठी यवतमाळ स्थानकाचा संसार सुरू आहे.

या गाडीचा वेग इतका कमी असतो की कुणीही धावत्या गाडीत चढू वा उतरू शकतो. 'हात दाखवा एसटी थांबेल', अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. शकुंतला एक्स्प्रेसने ही परंपरा फार पूर्वीपासून सांभाळली आहे. गाडी येताना पाहून कुणी हात दाखवला तर त्याला घेऊनच मग ही गाडी पुढे निघते. तिकीट काढलेच पाहिजे असेही नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठी असते.

प्रवासाची अन्य साधने नसणार्‍या त्या काळात या गाडीने लोकांच्या थेट हृदयात जागा घेतली. लोक बकर्‍या, कोंबड्यांसह या गाडीने प्रवास करायचे. आजही करतात. प्रवाशी खाली पडणार नाही असा वेग या गाडीचा असल्याने ज्यांना डब्यात जागा मिळाली नाही ते टपावर चढून बसायचे.

रेल्वे फाटक आले की, लोको पायलट गाडी थांबवतो. फाटक लावून घेतो. गाडीने फाटक पार केले की मग पुन्हा उतरून रेल्वे फाटक उघडतो व त्यानंतर गाडी पुढे निघते, असेही या गाडीबद्दल सांगितले जाते.

शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आजवर सुदामकाका देशमुख, उषा चौधरी, माजी खासदार व राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रा.सू. गवई, अनंत गुढे या सर्व माजी खासदारांनी सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव देऊन प्रयत्‍नही केले होते.[१]

ब्रॉडगेजीकरण

ह्या दोन्ही रेल्वेगाड्या बंद झाल्या असता तर मूर्तिजापूर सोडले तर बाकी सारी गावे रेल्वेच्या नकाशावरून कायमची गायब झाली असती. परंतु, भारत सरकारने ऑगस्ट २०१६मधे दीड हजार कोटी मंजूर करून नॅरोगेजवर धावणारी 'शकुंतला' ब्रॉडगेजवर आणण्याचा प्रस्ताव आणला आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=131230:2011-01-22-15-28-41&Itemid=1. १० एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)