"प्रीतम सिंग जौहल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रीतम सिंग जौहल (जन्म : ४ ऑक्टोबर, इ.स. १९२०, मृत्यू : २८ जून, इ.स. २०१६...
(काही फरक नाही)

२३:२९, १३ जुलै २०१६ ची आवृत्ती

प्रीतम सिंग जौहल (जन्म : ४ ऑक्टोबर, इ.स. १९२०, मृत्यू : २८ जून, इ.स. २०१६) हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते.

जौहल यांचा जन्म पंजाबमधील एका छोट्या गावात झाला. हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण होणारे गावातील ते तिसरे विद्यार्थी. त्यांचे वडील लष्करात असल्याने प्रीतम सिंग यांनाही लष्करातच जायचे होते. आईचा मात्र त्यास विरोध होता. १७ व्या वर्षी त्यांना दिल्लीतील एका नातेवाईकाकडे पाठवण्यात आले. तेथेही वर्षभर ते बेकारच राहून, शेवटी जून १९३८ मध्ये इंडियन सिग्नल कोअरमध्ये भरती झाले.

दुसर्‍याच वर्षी दुसरे महायुद्ध सुरू झाले. १९४० साली प्रीतम सिंगाना ऑपरेटर म्हणून पूर्व आफ्रिकेत इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजनमध्ये पाठवण्यात आले. तेथे पहिल्यांदाच ते युद्धात सहभागी झाले. त्यांची ब्रिगेड लिबियात गेली आणि नंतर ती ब्रिटिश लष्कराचा भाग बनली. १९४२ मध्ये इजिप्तमध्ये जर्मन आक्रमण थोपवणा्र्‍या तुकडीत ते वायरलेस ऑपरेटर होते. तेथून त्यांची तुकडी जपानशी लढण्यासाठी ब्रह्मदेशातही गेली. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते सेकंड लेफ्टनंट हुद्द्तापर्यंत पोहोचले होते. खूप आजारी पडल्याने तेथून मग ते मायदेशी परतले. पण भारतीय लष्करात सेवा चालूच होती.

पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही लढायांमध्ये प्रीतम सिंग यांचा सहभाग होता. काही काळ त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेसाठीही पाठवण्यात आले होते. १९७६ मध्ये ते लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाले आणि चंडीगढमध्ये स्थायिक झाले. त्यांची तीनही मुले कॅनडात असल्याने त्यांच्या आग्रहाखातर १९८० मध्ये तेही कॅनडातील सरे प्रांताचे रहिवासी बनले.

पगडीसाठी संघर्ष

कॅनडात सैन्यदलातील माजी जवान व अधिकार्‍यांच्या कल्याणासाठी झटणार्‍या ‘रॉयल कॅनेडियन लीजन’ या संस्थेतर्फे १९९३ साली प्रीतम सिंग जौहल यांना सन्मानाने आमंत्रित करण्यात आले. पण तेथे गेल्यावर मुख्य कार्यक्रम असलेल्या सभागृहात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आत जायचे असेल तर डोक्यावरील शीख फेटा (पगडी) काढूनच जावे लागेल असे त्यांना सांगण्यात आले.. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी त्यासाठी लढा दिला. िंग्लंडच्या राणीलाही पत्र लिहिले. महाराणीपर्यंत हा वाद गेल्यानंतर मात्र संस्थेने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी तर व्यक्त केलीच पण आपल्या नियमांतही सुधारणा केली.

पुस्तक

प्रीतम सिंग जौहल यांनी दुसर्‍या महायुद्धकालीन सैनिकी जीवनाबद्दल ‘अ सोल्जर रिमेंबर्स’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. [[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]