"अरुण दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७१: ओळ ७१:


==लेखन==
==लेखन==
* अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे.
* अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. (२६-५-२०१६)
* अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन [[सुलभा तेरणीकर]] यांचे आहे, अशी बातमी होती, पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही.
* अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन [[सुलभा तेरणीकर]] यांचे आहे, अशी बातमी होती, पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही. बातमी अनेक ठिकाणी वाचायला मिळाली होती.
* सुरेश ठाकुर यांचे ‘शतदा प्रेम करावे’ याच नावाचा हा ललित लेखसंग्रह आहे.
* सुरेश ठाकुर यांचे ‘शतदा प्रेम करावे’ याच नावाचा हा ललित लेखसंग्रह आहे.



१६:००, २६ मे २०१६ ची आवृत्ती

अरुण दाते
आयुष्य
जन्म ४-५-१९३४
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील रामूभय्या दाते
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत, भावगीत
पेशा गायकी

अरुण दाते(जन्म : ४ मे, इ.स. १९३४) हे एक मराठी भावगीत गायक आहेत. भारतीय संगीताच्या क्षेत्रात राजवाड्याबाहेर जे संगीताचे दरबार भरत, त्यांत इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. हे रामूभैय्या म्हणजे अरुण दातेंचे वडील. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने पुढे प्रत्यक्षात आणले.

अरुण दाते टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले "टेक्स्टाईल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाईल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.

इ.स. १९५५पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत म्हणजे इ.स.१९८४मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते."मी हिंदी मुलखातला, माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही" असे म्हणणार्‍या अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. इ.स. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणार्‍या मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल होत आले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते.

अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात.आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. या बाबतीत ते गजाननराव वाटव्यांचे शिष्य आहेत.

लेखन

  • अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. (२६-५-२०१६)
  • अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचे आहे, अशी बातमी होती, पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही. बातमी अनेक ठिकाणी वाचायला मिळाली होती.
  • सुरेश ठाकुर यांचे ‘शतदा प्रेम करावे’ याच नावाचा हा ललित लेखसंग्रह आहे.

पुरस्कार

  • पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (इ.स.२०१०)
  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२०१६)

बाह्य दुवे

अरुण दाते यांनी गायलेल्या भावगीताचे शब्द भावगीताचे कवी संगीत दिग्दर्शक
अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी मंगेश पाडगावकर यशवंत देव
भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी मंगेश पाडगावकर यशवंत देव
भेट तुझी माझी स्मरते मंगेश पाडगावकर यशवंत देव
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मंगेश पाडगावकर यशवंत देव
शुक्र तारा मंद वारा मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळे
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला शंकर वैद्य हृदयनाथ मंगेशकर
सूर मागू तुला मी कसा