"विनीता पवनीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विनिता विवेक पवनीकर या अमेरिकेतील २६ विशेष निष्णात स्त्री अभियं...
(काही फरक नाही)

१३:३१, २५ मे २०१६ ची आवृत्ती

विनिता विवेक पवनीकर या अमेरिकेतील २६ विशेष निष्णात स्त्री अभियंत्यांपैकी एक आहेत.

शिक्षण

विनीता पवनीकर या नागपूरच्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्माला आल्या. वडलांचे नाव शिवाजीराव गोंगाडे. आधी त्या मुंबईत त्या न्यू सायन महानगरपालिका शाळेच्या मराठी माध्यमात सहावीपर्यंत शिकल्या. वडिलांच्या सरकारी फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचे पुढचे शालेय शिक्षण अकोला व नागपूर या शहरांतून झाले.

विनीता गोंगाडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूरच्या मेहता सायन्स कॉलेजमध्ये गेल्या. बारावीत गुणवत्ता यादीत आल्यावर व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांनी नागपूरच्या विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (आताचे व्हीएनआयटी) इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल शाखेत प्रवेश घेतला आणि त्या अंतिम परीक्षेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.

नोकर्‍या

विनीता पवनीकर यांनी सुरुवातीला मुंबईतील ‘बेस्ट’ कंपनीत आणि नंतर टाटा ग्रुपच्या ‘नेल्को’ कंपनीत अभियंता म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्या झेनिथ काँप्युटर्समध्ये गेल्या व डेव्हलेपमेंट मॅनेजर झाल्या.