"गरुडाचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: क्रिकेटपटू गरुडाचार, पूर्ण नाव - बिडिगनविले कृष्णस्वामी अय्यंगर...
(काही फरक नाही)

०७:३२, १२ मे २०१६ ची आवृत्ती

क्रिकेटपटू गरुडाचार, पूर्ण नाव - बिडिगनविले कृष्णस्वामी अय्यंगर गरुडाचार (जन्म : चिकमंगळूर, १३ जानेवारी, इ.स. १९१७; मृत्यू : बंगलोर, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे म्हैसूरच्या संघातून आणि संयुक्त प्रांताच्या क्रिकेट संघातून रणजी ट्रॉफी सामने खेळणारे एक क्रिकेटपटू होते. ९९व्या वर्षी निधन पावलेले हे आधुनिक काळातले सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू होते.

गरुडाचार यांनी बनारस विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. ते क्रिकेटमध्ये ऑल राउंडर होते. इ.स. १९३५-३६ ते १९५०-५१ या कालावधीत त्यांची क्रिकेट कारकीर्द बहरात होती. २७ प्रथमश्रेणी सामन्यांत त्यांनी एका शतकासह एकूण ११२६ धावा केल्या होत्या. त्यांची सरासरी २९.६३ होती.

गरुडाचार उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करायचे. गोलंदाजीत त्यांने १००हून अधिक बळी घेतले होते. एकाच सामन्यात पाच गडी बाद करण्याची कामगिरी सात वेळा, आणि दहा विकेट घेण्याची कामगिरी त्यांनी तीन वेळा केली होती.

१९४१-४२ मध्ये गरुडाचार यांनी उत्तम खेळ करून म्हैसूर संघाला रणजी ट्रॉफी मिळवून दिली.

इ.स. १९४६च्या सुमारास क्रिकेटपटू गरुडाचार यांनी सी.के.नायडू कर्णधार असलेल्या होळकर संघाविरुद्ध १६४ धावांची खेळी केली. या सामन्यात ते म्हसूर संघाचे कर्णधार होते.याच सामन्याने गरुडाचार यांनी त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीची समाप्ती केली.


(अपूर्ण)


आज़ादी-पूर्व भारत के मैसूर क्रिकेट टीम के कप्तान बीके गरुडाचार का निधन हो गया है. उनका पूरा नाम बिडिगनविले कृष्णस्वामी अयंगर गरुडाचार था. उनका जन्म 13 जनवरी 1917 में हुआ और उनकी उम्र 99 थी. गरुडाचार भारत के सबसे उम्रदराज जीवित क्रिकेटर थे. वो आल-राउंडर थे व 1941-42 में शानदार प्रदर्शन के चलते मैसूर को रणजी ट्रॉफी जीताई थी.