"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७५: ओळ ७५:
==मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार==
==मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार==
* मुंबईची अॅड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्था दरवर्षी ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.
* मुंबईची अॅड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्था दरवर्षी ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.
* अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पाचवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१०) : डॉ. रमेश गोडबोले यांना मिळाला होता.

* अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२) : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.
* अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना प्रदान झाला.





२१:४८, ७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

मारुती चितमपल्ली
जन्म नाव मारुती चितमपल्ली
जन्म नोव्हेंबर ५, १९३२
सोलापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वन्यजीवाभ्यास, लेखन
भाषा मराठी
साहित्य प्रकार निसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन
विषय निसर्ग, वन्यजीवन
चळवळ वन्यजीवन संवर्धन
प्रसिद्ध साहित्यकृती पक्षी जाय दिगंतरा
प्रभाव मराठी साहित्यात निसर्ग विषयक लिखाणाची सुरुवात
पुरस्कार इ.स.२००६ सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

मारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)

वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ नोकरी. ६५वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.

बालपण

चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणार्‍यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्‍यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागली. मारुती चितमपल्ली वयाच्या नवव्या वर्षी शाळेत जाऊ लागले. पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फुकटच झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले.

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.

वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्‍या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोइल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांच्ये वर्णन करताना उपयोगी पडले.

लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला पहिला गुरू. त्याने (काम चालू)

मारुती चितमपल्ली यांची ग्रंथ संपदा

मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार

  • मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
  • नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
  • एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
  • त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
  • रानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.
  • [पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले (२०१०), अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे (२०१३) यांना मिळाला आहे.

मारुती चितमपल्ली यांच्यावरचे पुस्तक

  • मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी (संपादक - सुहास पुजारी, प्रकाशन डिसेंबर २०१२)

मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार

  • मुंबईची अॅड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्था दरवर्षी ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.
  • अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पाचवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१०) : डॉ. रमेश गोडबोले यांना मिळाला होता.
  • अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२) : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.
  • अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना प्रदान झाला.