"म.श्री. दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:


==पुस्तके==
==पुस्तके==
* अहिल्याबाई होळकर (चरित्र)
* आनंदीबाई पेशवे (चरित्र)
* भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
* आम्ही चित्पावन - कोकणस्थ
* इतिहासातील भ्रमंती
* र्कोणीसाव्या शतकातील महाराष्ट्र
* ओठावरची गाणी (संकलन-संपादन)
* कौरव पांडव (कथासंग्रह)
* Queen of Jhansi
* शिवरायांची आई : जिजाई (चरित्र)
* वीररमणी झाशीची राणी (चरित्र)
* तात्या टोपे (चरित्र)
* नेपोलियन (चरित्र)
* पुण्याचे शिल्पकार
* प्रतापी बाजीराव (चरित्र)
* बाळाजी विश्वनाथ (चरित्र)
* महाराष्ट्र साहित्य परिषद (इतिहास)
* मुळा-मुठेच्या तीरावरून
* भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (चरित्र)
* लोकप्रिय नाट्यगीते (संकलन-संपादन)
* व्यक्तिविशेष
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)
* Laalbahadur Shastri (बालवाङ्‌मय)
* सत्तावनचे सप्तर्षी
* शिर्डीचे साईबाबा (चरित्र)
* साईबाबांचे सांगाती
* क्रांतिवीर सावरकर (चरित्र)


{{DEFAULTSORT:दीक्षित,मधुकर श्रीधर}}
{{DEFAULTSORT:दीक्षित,मधुकर श्रीधर}}

२३:२८, ४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

मधुकर श्रीधर उर्फ म.श्री. दीक्षित (१६ मे, इ.स. १९२४:राजगुरुनगर, महाराष्ट्र - १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४:पुणे, महाराष्ट्र) हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इतिहास लेखक व संपादक होते. त्यांना पुण्याचा चालता बोलता इतिहास असे म्हणत.[ संदर्भ हवा ]

शिक्षण

दीक्षित यांचे प्राथमिक शिक्षण खेड येथे, तर पुढचे इंटर आर्ट्‌सपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले.

नोकरी

शिक्षण पूर्ण झाल्यानंत दीक्षित यांनी खेड येथील न्यायालयात त्यांनी ६-७ महिने नोकरी केली. १९४५मध्ये पुण्यात स्थायिक झाल्यानंतर दीक्षितांनी पुण्यातील मिलिटरी अकाऊंट्‌स खात्यात नोकरी केली.

मसाप

लेखक श्री.म. माटे यांच्याकडे दीक्षितांनी लेखनिक म्हणून काम करायला सुरूवात केल्यावर त्यांचा संबंध महाराष्ट्र साहित्य परिषदेशी आला, तो जवळपास ६० वर्षे टिकला.

१९४७ ते १९७२ या काळात म.श्री. दीक्षित यांनी परिषदेच्या कार्यालयात अधिक्षक म्हणून काम पाहिले. यातून मुक्त झाल्यानंतर कार्यकर्ता या नात्याने त्यांनी परिषदेच्या कामात सहभाग घेतला. १९७६ ते १९८९ या काळात ते कोषाध्यक्ष, तर १९८९ ते १९९८ याकाळात ते साहित्य परिषदेचे विश्वस्त होते. म.श्री. दीक्षित यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १०५ वर्षांचा इतिहास लिहून प्रसिद्ध केला.

अन्य संस्था

साहित्य परिषदेच्या व्यतिरिक्त पुण्यातील इतरही काही संस्थांच्या जडण-घडणीत, त्यांचा मोलाचा सहभाग होता. पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, महाराष्ट्र ग्रंथोत्तोजक संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली.

लेखन

म.श्री दीक्षित यांनी ६० वर्षे वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून विविध प्रकारचे प्रासंगिक, ऐतिहासिक व चरित्रात्मक लेखन केले. त्यांत अहिल्याबाई, जिजाबाई, तात्या टोपे, नेपोलियन, बाजीराव आदींची चरित्रे आहेत. अनेक स्मरणिकांचे संपादनही त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांनी शंभरावर पुस्तक परीक्षणे लिहिली. त्यांचे आत्मचरित्रही आहे.

पुस्तके

  • अहिल्याबाई होळकर (चरित्र)
  • आनंदीबाई पेशवे (चरित्र)
  • भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
  • आम्ही चित्पावन - कोकणस्थ
  • इतिहासातील भ्रमंती
  • र्कोणीसाव्या शतकातील महाराष्ट्र
  • ओठावरची गाणी (संकलन-संपादन)
  • कौरव पांडव (कथासंग्रह)
  • Queen of Jhansi
  • शिवरायांची आई : जिजाई (चरित्र)
  • वीररमणी झाशीची राणी (चरित्र)
  • तात्या टोपे (चरित्र)
  • नेपोलियन (चरित्र)
  • पुण्याचे शिल्पकार
  • प्रतापी बाजीराव (चरित्र)
  • बाळाजी विश्वनाथ (चरित्र)
  • महाराष्ट्र साहित्य परिषद (इतिहास)
  • मुळा-मुठेच्या तीरावरून
  • भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (चरित्र)
  • लोकप्रिय नाट्यगीते (संकलन-संपादन)
  • व्यक्तिविशेष
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)
  • Laalbahadur Shastri (बालवाङ्‌मय)
  • सत्तावनचे सप्तर्षी
  • शिर्डीचे साईबाबा (चरित्र)
  • साईबाबांचे सांगाती
  • क्रांतिवीर सावरकर (चरित्र)