"मराठी प्रबंध सूची (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी हे १९८५ साली नागपूर विद्यापीठाच्या ग्...
(काही फरक नाही)

२१:३८, ३१ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी हे १९८५ साली नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मराठीच्या प्रेमापोटी मराठीतील प्रबंधसंपदा विद्यार्थी आणि संशोधकांच्या कार्यासाठी उपयोगी पडावी म्हणून सन १९८५ ते १९९१ पर्यंत शोधकार्य करून, त्यांनी प्रथम डी.लिट. आणि आचार्य पदवी मिळविणार्‍यांपासून तर १९९१ पर्यंतच्या मराठी विषयातील तब्बल ७५८ प्रबंधांची नावे, त्यातील विषय व संशोधनकारांच्या नावे असलेली मराठी प्रबंधसूची हे पुस्तक प्रकाशित केले.

त्यासाठी कुळकर्णी यांनी स्वखर्चाने राज्यातील सर्व विद्यापीठे फिरून माहिती गोळा करण्याचे काम केले. केवळ माहिती गोळा करून त्यांचे काम थांबलेले नाही; तर प्रत्येक विद्यापीठात संशोधन करणार्‍या ’महिला संशोधक' विषयातील प्रकारनिहाय नावे, एकसारखे लिखाण असलेल्या शोधप्रबंधांचा संग्रह त्यांनी गोळा केला. सध्या त्यांच्याकडे २००७ पर्यंतची तब्बल सतराशे प्रबंधांची सूची आहे. त्याचे ग्रंथस्वरूपात प्रकाशन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. केवळ मराठी प्रबंधांची यादीच नव्हे; तर डॉ. कुळकर्णी यांनी सर्वाधिक अकरा कोशही प्रकाशित केले आहेत.

प्रबंधसूची तयार करण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर देशात कुठेही प्रादेशिक भाषेतील सूची नसून केवळ मराठीतच ती असल्याचा दावा डॉ. कुळकर्णींचा आहे. मराठीच्या प्रबंधांना २०१२ साली ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने २००७ ते २०१२ या दरम्यानच्या प्रबंधांचा आढावा असलेली सूची प्रकाशित करण्याची शेवटची इच्छा असल्याचे ते बोलून दाखवितात.

ही सूची करताना नागपूर विद्यापीठाने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. त्यांच्या ग्रंथालयाकडे मराठीविषयीचे अनेक प्रबंध नसल्याची बाबही समोर आली