"रघुवीर चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रघुवीर चौधरी (जन्म : गुजरात, ५ डिसेंबर.इ.स. १९३८) हे एक गुजराथी भाषेत...
(काही फरक नाही)

००:५७, २७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

रघुवीर चौधरी (जन्म : गुजरात, ५ डिसेंबर.इ.स. १९३८) हे एक गुजराथी भाषेत लिहिणारे लेखक आहेत.

चौधरी यांचा जन्म गांधीनगरजवळील बापुपुरा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण मन्सा येथे झाले. गुजरात विद्यापीठातून त्यांनी "एमए‘ची पदवी घेतली. गुजरात विद्यापीठातच ते १९७७ मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि प्राध्यापक म्हणून १९९८ मध्ये निवृत्त झाले.

स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच "आणीबाणी‘ला कडाडून विरोध करणारे आणि विपुल साहित्यसंपदा निर्माण करणारे ज्येष्ठ गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ज्ञानपीठ मिळविणारे चौधरी हे चौथे गुजराती लेखक आहेत. यापूर्वी उमा शंकर जोशी (१९६७), पन्नालाल पटेल (१९८५) आणि राजेंद्र शाह (२००१) यांना हा पुरस्कार मिळाला होता. सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्तिपुस्तक आणि रोख अकरा लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

रघुवीर चौधरी यांचे लेखन

एकीकडे ज्ञानदान करतानाच गुजराती साहित्यात त्यांनी विविध विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. त्यांनी कथा, कादंबरी, नाटके, कविता, लघुकथा तसेच गुजराती भाषेतील दैनिकांमध्ये स्तंभलेखक म्हणून लेखन केले आहे.

पुस्तके

कादंबर्‍या

  • अमृता
  • आवरन
  • उपवास कथात्रयी
  • एक डाग आगल ने बे डाग पाछल
  • पूर्वरंग लागणी
  • रुद्र महल्य
  • वेणू वत्सल
  • सोमतीर्थ

नाटके

  • तिजो पुरुष
  • डिम लाइट,
  • सिकंदर सानी

काव्यसंग्रह

  • तमासा
  • वहेता वृक्ष पवनमा


पुरस्कार

  • रघुवीर चौधरी यांच्या ‘उपवास कथात्रयी‘ या कादंबरीला १९७७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
  • २०१५ सालातला ज्ञानपीठ पुरस्कार

वरः: ज्ञनपीठ पुरस्कारविजेते