"रमेश इंगळे उत्रादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रमेश इंगळे उत्रादकर हे एक मराठी लेखक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळ...
(काही फरक नाही)

१३:२३, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

रमेश इंगळे उत्रादकर हे एक मराठी लेखक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळे आणि घरात शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे रमेश इंगळे उत्रादकरही याच पेशात आले. मात्र संधी असतानाही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वर्गांना न शिकवता, आवड म्हणून ते कित्येक वर्षं बुलढाण्याजवळ एका खेड्यातील शाळेत प्राथमिक शाळेतच शिकवत राहिले.

उत्रादकरांना साहित्याची आवडही लहानपणापासूनच होती. त्यातूनच शेगाव - बुलढाणा - जळगाव परिसरातील समवयस्क साहित्यप्रेमी मित्रांच्या संपर्कात ते आले आणि 'शब्दवेध' या प्रसिद्ध नियतकालिकाशी जोडले गेले. या नियतकालिकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा 'सर्वोत्कृष्ट नियतकालिका'चा पुरस्कार मिळाला, तेव्हा उत्रादकरच त्याचे संपादक होते.

त्यानंतर लवकरच उत्रादकरांनी स्वतःचे 'ऐवजी' हे साहित्याला वाहिलेले नवे नियतकालिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते साहित्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले.

मात्र रमेश इंगळे उत्रादकर 'निशाणी डावा अंगठा' या कादंबरीमुळेच नावारूपाला आले. या कादंबरीला महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराप्रमाणेच मॅजेस्टिक प्रकाशनाचा मनाचा जयवंत दळवी पुरस्कारही मिळाला. मात्र या कादंबरीतील मिश्किल भाषेमुळे सुरुवातीला या पुरस्काराच्या निवड समितीने या कादंबरीला 'विनोदी कादंबरी' म्हणून पुरस्कार दिला होता, मात्र तेव्हा तो उत्रादकरांनी नम्रपणे नाकारला होता; कारण ही कादंबरी विनोदी नाही, तर उपरोधिक आहे आणि विनोदनिर्मिती हा तिचा हेतू नाही, असे त्यांनी तेव्हा निवड समितीला कळवले. त्यामुळे त्यांचा त्यावर्षीचा जयवंत दळवी पुरस्कार हुकला. मात्र पुढच्या वर्षी त्याच निवड समितीने तोच पुरस्कार उत्रादकरांच्या त्याच ' निशाणी डावा अंगठा ' ला दिला आणि तोही 'सर्वोकृष्ट साहित्या'साठी.