"शशिकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==कुटुंब==
==कुटुंब==
शशिकला आपल्या जवळकर कुटुंबातल्या सहा मुलांपैकी सर्वात धाकट्या होत्या.

ओम प्रकाश सैगल हे शशिकलाबाईंच्या पतीचे नाव.
ओम प्रकाश सैगल हे शशिकलाबाईंच्या पतीचे नाव.



०९:२०, ९ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

शशिकला (जन्म : सोलापूर, ८ जानेवारी,१९३३) ह्या एक हिंदी चित्रपटांत कामे करणाऱ्या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म सोलापूरच्या जवळकर कुटुंबात झाला. लहानपणीच त्यांच्या कुटुंबाने शशिकलाची अभिनयाची आणि नृत्याची हौस पुरवली. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या नाच शिकू लागल्या.

पुढे मुंबईला आल्यावर स्वतः जवळकर आणि मुलेही काम शोधू लागली. तशाही काळात लोकप्रिय गायिका-नूरजहान हिला भेटण्याची इच्छा शशिकला यांनी पूर्ण केली. एखाद्या परीकडे सिंड्रेलाने वर मागावा तसे, शशिकला यांनी नूरजहाँकडेच 'काम शोधते आहे' हेही सांगून टाकले.. आणि नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकलाबाईंना संधी मिळाली. अशाच लहान-मोठ्या दृश्यांत कामे करता-करता शशिकला यांना व्ही. शांताराम यांनी 'तीन बत्ती चार रास्ता'मध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिकेची संधी दिली. हे पात्र शशिकला यांनी असे काही रंगवले की, १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. या खलभूमिकांची त्यांनी अल्पावधीत गाठलेली सर्वोच्च शिखरे म्हणजे 'आरती' (१९६२), 'गुमराह' (१९६३) आणि 'फूल और पत्थर' (१९६६).

कुटुंब

शशिकला आपल्या जवळकर कुटुंबातल्या सहा मुलांपैकी सर्वात धाकट्या होत्या.

ओम प्रकाश सैगल हे शशिकलाबाईंच्या पतीचे नाव.

समाजसेवा

शशिकलाबाईंनी १९८० च्या दशकात, मदर तेरेसांच्या ओढीने 'मिशनरीज ऑफ चॅरिटीज'मध्ये सेवा करण्यासाठी घरदारही सोडले. कुष्ठरुग्णांची सेवा, फरशा पुसणे अशी कोणतीही कामे त्या तेथे करीत होत्या.

चित्रपट

  • आरती (१९६२ - मीनाकुमारीची भावजय 'जसवंती'ची भूमिका)
  • आहिस्ता आहिस्ता
  • गुमराह (१९६३ - माला सिन्हाला ब्लॅकमेल करणारी 'मिस रॉबर्ट ऊर्फ लीला'ची खलनायकी भूमिका)
  • जंगली
  • तीन बत्ती चार रास्ता ( १९५३ - मराठी भावजयीची भूमिका)
  • नीला आकाश
  • फूल और पत्थर (१९६६)
  • महानंदा ( प्रेमापेक्षा व्यवहारच पाहणाऱ्या भावीण आईची भूमिका)
  • सुजाता (अल्लड धनिक मुलीची भूमिका)

पुरस्कार

  • आरती आणि गुमराहमधील भूमिकांसाठी 'फिल्मफेअर' पुरस्कार
  • केंद्र सरकारकडून पद्मश्री (इ.स. २००७)
  • 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'कडून जीवनगौरव पुरस्कार (२०१४)
* महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 'राज कपूर कारकीर्द-गौरव पुरस्कार(२०१५)