"कांचन सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कांचन सोनटक्के या अंध, अपंग, मूक-बधिर आणि "विशेष‘ मुलांमधील कौशल्...
(काही फरक नाही)

१५:१४, २७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

कांचन सोनटक्के या अंध, अपंग, मूक-बधिर आणि "विशेष‘ मुलांमधील कौशल्याचा विकास कलेच्या माध्यमातून अधिक नेटकेपणाने होतो, असा विश्वास बाळगणार्‍या एक कार्यकर्त्या आहेत.

कांचन सोनटक्के यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर "विशेष‘ मुलांसाठी नाट्यशिबिरे घेतली आहेत. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. ’विशेष‘ मुलांमधील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कांचनताईंनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घेतलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग झाला आहे.

’विशेष‘ मुलांमधील जाणिवा अधिकाधिक विकसित करण्यासाठी कांचनताईंनी ’थिएटर आर्टस‘चा उपयोग करून घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात त्यांनी वाद्यसंगीत, गायन, नृत्य, नाट्य, हस्तकला आणि मल्लखांबासारख्या कलाप्रकारांचे शिक्षण सुरू केले. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांमधील कलाकौशल्य वाढविण्यासाठी त्या तळमळीने कार्यरत राहून त्यांनी संपूर्ण देशात कला प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या कलावंतांचे पथक तयार केले.आपल्या कार्याला मदत व्हावी म्हणून कांचनताईंनी ’नाट्यशाला‘ नावाची संस्था स्थापन केली. केवळ मुलेच नव्हे, तर शिक्षकांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे मुलांची कलाजाणीव वाढते, त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, शैक्षणिक गुणवत्ता सुधारते, असे पालक आणि शिक्षकांचे निरीक्षण आहे. इतकेच नव्हे तर ’विशेष‘ मुलांचा सामाजिक वर्तन व्यवहारही सुधारत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे आठ हजार शिक्षकांनी आजवर हे प्रशिक्षण घेतले आहे. पाच हजार मुलेही त्यांत सामील झाली आहेत. हा उपक्रम अव्याहत सुरू आहे.