"हमीद गुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हमीद गुल (जन्म: सरगोधा-पाकिस्तान, २० नोव्हेंबर, १९३६; मृृत्यू : मुर...
(काही फरक नाही)

२१:५८, १९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

हमीद गुल (जन्म: सरगोधा-पाकिस्तान, २० नोव्हेंबर, १९३६; मृृत्यू : मुरी-पाकिस्तान, १५ ऑगस्ट, २०१५), वडलांचे नाव मोहम्मद खान, हे पाकिस्तानच्या आयएस‍आय या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते.

अखंड भारतद्वेष

भारताने १९७१ साली पाकिस्तानचे तुकडे करून बांगला देश जन्माला घातल्यानंतर ज्या तरुण लष्करी अधिकार्‍यांच्या मनात भारतविरोधाचे बीज रुजले, त्यातले हमीद गुल हे एक होत.

जेव्हा १९८७ साली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुखपद (1987–1989) हमीद गुल यांच्याकडे चालून आले तेव्हा त्यांनी त्याचा वापर पाकिस्तानात एक भरभक्कम भारतविरोधी दहशतवादी यंत्रणा उभारण्यासाठी केला. जमात उद् दावा आणि लष्कर ए तयबाचा प्रणेता हाफीज सईद यांची व त्यांची मैत्री तेव्हापासूनच मैत्री होती.

युद्धाची खुमखुमी

हमीद गुल हे भारताला धडा शिकवायच्या वेडाने इतके झपाटलेले होते की, त्यांच्या डोक्यात भारताविरोधात अणुबॉम्ब कसा वापरता येईल याचेच डावपेच घोटाळत राहायचे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा म्हणजे त्याचा समाचार घेता येईल अशी इच्छा ते वारंवार बोलून दाखवत. त्यासाठीच ते सरहद्दीवर पुन्हापुन्हा दहशतवादी हल्ले आयोजित करत.भारत आणि पाकिस्तान यांच्यांत शांतता चर्चा सुरू झाली की, त्यांचे डोके फिरत असे आणि मग ते हाफिज सईदच्या मसलतीने अतिरेकी हल्ल्याच्या नवनव्या योजना आखत असत.


निवृत्ती

हमीद गुल हे आयएस‌आयच्या प्रमुखपदावरून इ..स. १९८९ रोजी निवृत्त झाले.


(अपूर्ण)