"गणपत लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: क्रांतिअग्रणी गणपत दादा लाड ऊर्फ बापू लाड (जन्म : कुंडल-सांगली जि...
(काही फरक नाही)

१५:५७, १७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

क्रांतिअग्रणी गणपत दादा लाड ऊर्फ बापू लाड (जन्म : कुंडल-सांगली जिल्हा; मृत्यू : कुंडल, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नानापाटील यांच्या प्रति सरकारच्या तुफानी दलाचेे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.

इतिहास

१९४२च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींच्या आदेशाला प्रतिसाद देऊन देशभरातील ज्या तरुणांनी उडी घेतली. त्या लाखो तरुणांपैकी एक असलेल्या जी.डी. लाड यांनी पुण्यात बीएएम्‌एस्‌चे-आयुर्वेदाचे शिक्षण अर्ध्यावर टाकून लढ्यात उडी घेतली. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांनी सांभाळले. देशात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना त्यावेळच्या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते.

तुफानी दल

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्रपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नागनाथअण्णा नायकवडी, उत्तमराव पाटील या सहकार्‍यांसोबत साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटणार्‍या या क्रांतिकारकांचे नेतृत्व बापू लाड यांनी केले. या लुटीवेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊन ते मैलोन्‌मैल चालले.


(अपूर्ण)