"म.सु. पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मधुकर सु. पाटील (जन्म : अलिबाग, इ.स. १९३१) हे एक कव्यसमीक्षक असून वैच...
(काही फरक नाही)

१५:३६, ६ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

मधुकर सु. पाटील (जन्म : अलिबाग, इ.स. १९३१) हे एक कव्यसमीक्षक असून वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या तुटपुंज्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकर्‍याच्या कुटुंबात झाला. घरी-दारी ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा स्पर्शही नव्हता. तरीही चांगले मराठी शिकायची जिद्द पाटलांच्या मनात होती.

त्या वेळच्या व्हर्नाक्‍युलर फायनलच्या परीक्षेत केवळ त्यांच्या शाळेतूनच नव्हे; तर संपूर्ण कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाटील मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचर्‍यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.

वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले. ज्या काळात मधूचे मित्र अलिबागला जाऊन राष्ट्र सेवा दलाच्या भारल्या वातावरणात साने गुरुजी-खांडेकर-कुसुमाग्रज-यशवंत वाचत होतो. त्याच काळात हे सारे केव्हाच पुरे करून मधू पाटील शरच्चंद्र चटर्जी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे अनुवाद वाचत होतेा आणि सत्यजित राय यांचे चित्रपट पाहत होते; उच्च दर्जाचं अभिजात साहित्य म्हणजे काय आणि उच्च अभिरुचीचे भारतीय परिवेशातील मानवी मनाचा शोध घेणारे चित्रपट म्हणजे काय, याचा अनुभव घेत होते.

शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मनमाड महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले.

कवयित्री आणि लेखिका नीरजा या म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांच्या पत्‍नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत.

प्रा. म.सु.पाटील यांनी लिहिलेली पुस्तके

  • तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे
  • दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
  • प्रभाकर पाध्ये : वाड्मयदर्शन (संपादित, सहलेखक - गंगाधर पाटील)
  • लांबा उगवे आगरीं (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर)
  • सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध
  • ज्ञानेश्वरीचा काव्यबंध
  • ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध