"अंजली कऱ्हाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अंजली कर्‍हाडकर (सासरच्या परांजपे; जन्म : १६ डिसेंबर, १९६१) या एक म...
(काही फरक नाही)

१३:२४, २९ जुलै २०१५ ची आवृत्ती

अंजली कर्‍हाडकर (सासरच्या परांजपे; जन्म : १६ डिसेंबर, १९६१) या एक मराठी कवयित्री, लेखिका, कीर्तनकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या केंब्रिज विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त नाट्य प्रशिक्षकही आहेत.

अंजली कर्‍हाडकर यांना २५व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत ३ रजत पदके मिळाली होती.

तळेगाव दाभाडे येथे राहणार्‍या अंजली कर्‍हाडकर वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय, लेखन व दिग्दर्शनाने रंगभूमीशी जोडल्या गेलेल्या आहेत. नव्या पिढीपर्यंत उत्तम साहित्य व चांगल्या कलाकृती पोहोचाव्यात या उद्देशाने त्या शिवमंगल स्वरनाट्यधारा हा उपक्रम चालवतात. त्यांची तळेगावला कलापिनी नावाची नाट्यसंस्था आहे.

अंजली कर्‍हाडकर या संगीत विषय घेऊन एम.ए. झाल्या असून पुण्यात एस.एन.डी.टी. कॉलेजात संगीत शिकवतात. पुण्यातल्याच सिंबायोसिस इंटनॅशनल स्कूलमध्ये त्या नाट्यशिक्षक आहेत.

पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात २ ते ४ मार्च २०१४ या तारखांना २०वा दिशारी नाट्यमहोत्सव साजरा झाला. त्यावेळी २ मार्चला झालेल्या The untold that lies between the text and its staging. या विषयावर चर्चेचा कार्यक्रम होता. अंजलींचा त्यात सक्रिय सहभाग होता.

अंजली कर्‍हाडकर करीत असलेले नाट्यप्रयोग

  • अनंत युगाची जननी (अंजली कर्‍हाडकर यांचा एकपात्री नाट्य प्रयोग)
  • एका नाटकाचा मृत्यू (प्रायोगिक नाटक, लेखक - महेश एलकुंचवार, दिग्दर्शक - अंजली कर्‍हाडकर)
  • कथा ही बिलासखानी तोडीची (संगीत नाटक, निर्मात्त्या - अंजली कर्‍हाडकर). मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये झालेल्या ३ दिवसांच्या मराठी संगीत नाटक महोत्सवात २७-२-२०१३ रोजी हा नाट्यप्रयोग झाला होता.
  • छू मंतर (एकांकिका, लेखक - वसंत कानिटकर)
  • पुलंचे ’पौष्टिक जीवन (अंजली कर्‍हाडकर यांची भूमिका असलेला व २०१० साली परांजपे संमेलनात सादर केलेला नाट्यप्रयोग)
  • राणी लागले खूळ (बालनाट्य; अंजली कर्‍हाडकर यांचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन) १ल्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत या बालनाट्याला २रे पारितोषिक मिळाले होते.