"गंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३९: ओळ ३९:
* गङ्गाष्टकम् (वाल्मीकी)
* गङ्गाष्टकम् (वाल्मीकी)
* गङ्गाष्टकम् ([[आद्यशंकराचार्य]]
* गङ्गाष्टकम् ([[आद्यशंकराचार्य]]
* गंगाष्टक (श्रीधरवेंकटेश अय्यावाल)
* गङ्गास्तोत्रम् ([[आद्यशंकराचार्य]])
* गङ्गास्तोत्रम् ([[आद्यशंकराचार्य]])
* गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ)
* गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ)
* गङ्गाष्टोत्तरशतनामावली
* गङ्गाष्टोत्तरशतनामावली (एन. बालसुब्रमण्यम)
* गङ्गासहस्रनामस्तोत्रम्
* गङ्गासहस्रनामस्तोत्रम् (स्कंदपुराण)
* गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र)
* गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र)
* गङ्गास्तुतिः
* गङ्गास्तुतिः (धर्माब्धी)





१५:०२, २४ जुलै २०१५ ची आवृत्ती

गंगा
चित्र:गंगानदी.jpg
बनारसमधील गंगा घाट
इतर नावे भागिरथी.
उगम गंगोत्री, उत्तराखंड, भारत
मुख सुंदरवन, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश (बंगालचा उपसागर)
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत (उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल)
बांग्लादेश
लांबी २,५०७ किमी (१,५५८ मैल)
उगम स्थान उंची ४,२६७ मी (१३,९९९ फूट)
सरासरी प्रवाह १,९०० घन मी/से (६७,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १०,५०,०००
ह्या नदीस मिळते गंगा
उपनद्या यमुना, घागरा, गोमती
धरणे हरिद्वार, फरक्का

गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारतबांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड या राज्यात हिमालय पर्वतात होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोर्‍यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागरात मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो.

हिंदू धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले आहे. गंगेला माता म्हटले गेले आहे. लक्षावधी भारतीयांची गंगा नदी ही जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र (पाटणा), कनोज, कौशांबी, काशी, प्रयाग, मुर्शिदाबाद, मुंगेर, कांपिल्य, बेहरामपूर, कलकत्ता, इ. प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.

राजा रवी वर्मा यांनी काढलेले 'गंगा अवतरणाचे चित्र'

अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही कि.मी. पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पश्चिमेसस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.

गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन असे म्हणतात. येथे बर्‍याच वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.

यमुना ही गंगेची उपनदी स्वत:च एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते.

डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावदी डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत.

हिंदू धर्मातील गंगेचे स्थान

काव्यामधील गंगेचे स्थान

गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्येय लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • गङ्गालहरी (जगन्‍नाथ पंडित)
  • गङ्गाष्टकम् १ आणि २ (कालिदास)
  • गङ्गाष्टकम् (वाल्मीकी)
  • गङ्गाष्टकम् (आद्यशंकराचार्य
  • गंगाष्टक (श्रीधरवेंकटेश अय्यावाल)
  • गङ्गास्तोत्रम् (आद्यशंकराचार्य)
  • गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ)
  • गङ्गाष्टोत्तरशतनामावली (एन. बालसुब्रमण्यम)
  • गङ्गासहस्रनामस्तोत्रम् (स्कंदपुराण)
  • गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र)
  • गङ्गास्तुतिः (धर्माब्धी)


संदर्भ आणि नोंदी