"श्रीकांत मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ६३: ओळ ६३:
* अजून यौवनात मी (नायक)
* अजून यौवनात मी (नायक)
* अपूर्व बंगाल
* अपूर्व बंगाल
* अंमलदार
* अंमलदार (सर्जेराव)
* अबोल झाली सतार
* अबोल झाली सतार
* अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
* अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
ओळ ७९: ओळ ७९:
* चौर्‍यांऐंशीचा फेरा
* चौर्‍यांऐंशीचा फेरा
* जावयाचे बंड (श्रीकांत)
* जावयाचे बंड (श्रीकांत)
* तुझे आहे तुजपाशी (सतीश, श्याम)
* तुझे आहे तुजपाशी (सतीश, राजेश व श्याम)
* देवकी
* देवकी
* नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
* नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
ओळ ९३: ओळ ९३:
* रात्र नको चांदणी
* रात्र नको चांदणी
* लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
* लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
* वार्‍यावरची वरात (बोरटाके गुरुजी, शिरपा, शाहीर,व कडवेकर)
* शेर शिवाजी (शिवाजी)
* संकेत मीलनाचा (तो)
* संकेत मीलनाचा (तो)
* सरी गं सरी
* सरी गं सरी

२३:२७, ११ जून २०१५ ची आवृत्ती

श्रीकांत मोघे
जन्म ६ नोव्हेंबर, १९३२
किर्लोस्करवाडी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

श्रीकांत मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ६ नोव्हेंबर, १९३२) हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते आहेत. मराठी कवी कै. सुधीर मोघे यांचे हे थोरले बंधू होत.

बालपण आणि शिक्षण

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. महाविद्यालयात असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे बी.एस्‌सी. आहेत

महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.

श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.

’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.

कारकीर्द

श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती.

पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु, अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली.

नंतर, १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील श्रीकांत मोघेंच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक केले.

त्या सुमारास पु.ल. देशपांडे दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकातली एक भूमिका दिली.

आत्मचरित्र

श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ’नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन ६ फेब्रुवारी २०१५ रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात झाले.

श्रीकांत मोघे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)

  • अजून यौवनात मी (नायक)
  • अपूर्व बंगाल
  • अंमलदार (सर्जेराव)
  • अबोल झाली सतार
  • अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
  • अश्वमेघ (गिरीश)
  • असं झालं आणि उजाडलं
  • आंधळ्यांची शाळा
  • एका घरात होती
  • और भगवान देखता रहा (हिंदी)
  • कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
  • कृष्णाकाठी कुंडल
  • गरुडझेप (शिवाजी)
  • गारंबीचा बापू (बापू)
  • घरोघरी मातीच्या चुली
  • चिं.सौ.कां. चंपा गोवेकर
  • चौर्‍यांऐंशीचा फेरा
  • जावयाचे बंड (श्रीकांत)
  • तुझे आहे तुजपाशी (सतीश, राजेश व श्याम)
  • देवकी
  • नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
  • फक्त एकच कारण
  • बिकट वहिवाट
  • मन पाखरू पाखरू
  • मी स्वामी या देहाचा
  • मी हरलो, मी जिंकलो
  • मृत्युंजय (दुर्योधन)
  • म्हणून मी तुला कोठे नेत नाही
  • राजयाचा पुत्र अपराधी देखा
  • राजे मास्तर
  • रात्र नको चांदणी
  • लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
  • वार्‍यावरची वरात (बोरटाके गुरुजी, शिरपा, शाहीर,व कडवेकर)
  • शेर शिवाजी (शिवाजी)
  • संकेत मीलनाचा (तो)
  • सरी गं सरी
  • सहज जिंकी मना
  • साक्षीदार (मधुकर मोहिले)
  • सुंदर मी होणार (सुरेश)
  • सीमेवरून परत जा (सिकंदर, पौरस)
  • सौदामिनी
  • हा स्वर्ग सात पावलांचा

श्रीकांत मोघे यांचे काम असलेले चित्रपट

  • आम्ही जातो आमुच्या गावा
  • एक क्रांतिवीर वासुदेव बलवन्त फडके (हिंदी)
  • दोन्ही घरचा पाव्हणा
  • नंदिनी
  • निवृत्ती ज्ञानदेव
  • प्रपंच (पहिला चित्रपट. या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले).
  • मधुचंद्र
  • मनचली
  • शेवटचा माणूस राम
  • सिंहासन
  • उंबरठा

श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • काशीनाथ घाणेकर पुरस्कार
  • केशवराव दाते पुरस्कार
  • गदिमा पुरस्कार (२०१३)
  • नानासाहेब फाटक पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
  • शाहू छत्रपती पुरस्कार
  • ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
  • महाराष्ट्र सरकारचा इ.स. २०१४चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार