"प.वि. वर्तक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४: ओळ १४:

अशा भ्रमाचे कारण काय बरे असेल? यावर विचार करीत असता मला माझी शाळा (इ.८वी) आठवली.शाळा पुण्यातील मेहुणपुर्‍यात होती. शाळेचा रस्ता वर्तकाश्रमाजवळून होता. वर्तक घराण्यात तपकीर निर्मितीचा व्यवसाय पूर्वापार आहे. वर्तकी तपकीर नावाजलेली होती. तिची निर्मिती वर्तकाश्रमात होई. शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई. क्वचित शिंकाही येत. कुतूहल म्हणून मी एकदा वाड्याच्या आत जाऊन पाहिले. तिथे चौकात दळलेली तंबाखूपूड वाळत घातली होती. हे दृश्य डोळ्यापुढे आल्यावर वाटले की लहानपणी डॉक्टर इथे भावंडांबरोबर, मित्रांबरोबर खेळले असतील, तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असतील का? मला वैद्यकीय ज्ञान नाही, पण अशी एक शक्यता असावी असा आपला एक तर्क आहे एवढेच....य.ना. वालावलकर

==प.वि. वर्तकांच्या मते रामायण-महाभारताचा काळ==
डॉ. वर्तक यांच्या संशोधनाननुसार १६ ऑक्टोबर (इ.स.पू) ५५६१ या दिवशी रविवारी महाभारताचे युद्ध झाले. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. सूर्य द्विधा झाला अ्रसे व्यासांनी म्हटले आहे. ग्रहणामध्ये काळी तबकडी आणि भोवती प्रभामंडळ असे दोन भाग दिसतात. त्यावेळी सूर्याने ज्वाळा बाहेर फेकण्याचे कार्य केले हे व्यासांचे सांगणेसुद्धा विज्ञानाने मानले आहे ‘व्हॉएजर सॉफ्टवेअर वापरून अमेरिकेतील निलेश ओक यांनी वर्तकांनी शोधून काढलेल्या तारखा अचूक असल्याचे निष्कर्ष सिद्ध केले आहेत, असे म्हणतात. व्यासांनी अरुंधतीचा तारा वसिष्ठाच्या पुढे गेला असा जो उल्लेख केला आहे यावरून संपूर्ण महाभारताचा कालखंड निश्चितपणे शोधून काढता येईल, हे विधान डॉ. वर्तक यांनी १९७१ साली केले होते.

१६:५९, ३ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक (जन्म : २३ मे १९३४) हे व्यवसायाने डॉक्टर. त्‍यांचा तपकीर बनवण्याचा पिढीजात धंदा होता. ते सर्व सोडून प.वि. वर्तकांनी रामायण-महाभारताच्या संशोधनाकडे वळले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी ’वास्तव रामायण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचा ’महाभारता’वर आधारित ’स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

असे म्हणतात की सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली.

डॉ. प.वि. वर्तकांच्या बद्दलचा एक तर्क (’उपक्रम’वरून)

"फलज्योतिषाचा बोजवारा"(मनोविकास प्रकाशन) या पुस्तकात चौदा लेख संकलित केले आहेत. (संपादन:श्री.जगदीश काबरे). त्यांत "माझा ज्योतिषावर विश्वास नाही" हा पत्रकार ग.वा.बेहेरे यांचा लेख आहे. त्या लेखातील काही भाग असा:

"पुण्यातले डॉ.प.वि.वर्तक हे आपल्याजवळ अतीन्द्रिय शक्ती आहे, आपण अचूक भविष्य सांगतो.असा दावा करतात. एकदा त्यांच्या दवाखान्यात मी बसलो होतो. वेळ सायंकाळ सहाची होती. त्याकाळी गाजलेली एक कुस्ती बेळगावमध्ये चालू होती. मी विचारले नसताही त्या कुस्तीतला कोणता पैलवान कोणत्या डावावर किती वेळात जिंकणार हे आपल्या अतीन्द्रिय शक्तीने त्यांनी मला सांगितले. गमतीची गोष्ट अशी की नेमके त्याच्या विरुद्ध घडले. आम्ही तिथे बसलो असतानाच आम्हाला हे सारे रेडिओवृत्तातून कळले.(त्याकाळी टी.व्ही.नव्हते.) आपण त्या घटनेकडे पाहाण्यासाठी लावलेली दृष्टी चुकीच्या कोनावर लागल्यामुळे असे झाले असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. अर्थातच ते खोटे होते यांत शंका नाही."

पत्रकार बेहेरे यांनी न विचारता डॉ.वर्तकांनी त्यांना कुस्तीभविष्य का सांगितले त्याचे कारण उघड आहे.

"फलज्योतिषाचा बोजवारा" या पुस्तकातील हा लेख वाचण्यापूर्वी डॉ.वर्तकांची दिव्यदृष्टी, त्यांची अतीन्द्रिय शक्ती, अचूक भविष्यकथन, त्यांचे सूक्ष्म देहाने अंतराळभ्रमण याविषयींच्या बातम्या अधून मधून वाचल्या होत्या. डॉ.वर्तक वैद्यकशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांचा पुण्यात दवाखाना होता.(आता आहे की नाही कल्पना नाही.ते आता वयाच्या पंचाहत्तरीत असतील.) अतीन्द्रिय शक्तीचा दावा ते करीत हे खरे. पण त्यांनी बुवाबाजी केली नाही; लोकांना नादी लावून फसविले नाही. त्यांच्याविषयी असला कोणताच प्रवाद ऐकला/वाचला नाही. मग ते अतीन्द्रिय शक्ती, सूक्ष्मदेहाने मंगळग्रहावर भ्रमण असे दावे का करीत? हेतू काय? केवळ प्रसिद्धीसाठी कोणी हे करील असे वाटत नाही. आपल्यापाशी अलौकिक शक्ती आहेत असे डॉ.वर्तकांना प्राणिकपणे वाटत होते असे म्हणावे लागेल. शेवटच्या दहा बारा वर्षांत ते अतीन्द्रिय शक्तीविषयी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. पण असा दावा ते पूर्वी करत होते तेव्हा त्यांना तसे काही भास, भ्रम होत असावेत.

अशा भ्रमाचे कारण काय बरे असेल? यावर विचार करीत असता मला माझी शाळा (इ.८वी) आठवली.शाळा पुण्यातील मेहुणपुर्‍यात होती. शाळेचा रस्ता वर्तकाश्रमाजवळून होता. वर्तक घराण्यात तपकीर निर्मितीचा व्यवसाय पूर्वापार आहे. वर्तकी तपकीर नावाजलेली होती. तिची निर्मिती वर्तकाश्रमात होई. शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई. क्वचित शिंकाही येत. कुतूहल म्हणून मी एकदा वाड्याच्या आत जाऊन पाहिले. तिथे चौकात दळलेली तंबाखूपूड वाळत घातली होती. हे दृश्य डोळ्यापुढे आल्यावर वाटले की लहानपणी डॉक्टर इथे भावंडांबरोबर, मित्रांबरोबर खेळले असतील, तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असतील का? मला वैद्यकीय ज्ञान नाही, पण अशी एक शक्यता असावी असा आपला एक तर्क आहे एवढेच....य.ना. वालावलकर

प.वि. वर्तकांच्या मते रामायण-महाभारताचा काळ

डॉ. वर्तक यांच्या संशोधनाननुसार १६ ऑक्टोबर (इ.स.पू) ५५६१ या दिवशी रविवारी महाभारताचे युद्ध झाले. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. सूर्य द्विधा झाला अ्रसे व्यासांनी म्हटले आहे. ग्रहणामध्ये काळी तबकडी आणि भोवती प्रभामंडळ असे दोन भाग दिसतात. त्यावेळी सूर्याने ज्वाळा बाहेर फेकण्याचे कार्य केले हे व्यासांचे सांगणेसुद्धा विज्ञानाने मानले आहे ‘व्हॉएजर सॉफ्टवेअर वापरून अमेरिकेतील निलेश ओक यांनी वर्तकांनी शोधून काढलेल्या तारखा अचूक असल्याचे निष्कर्ष सिद्ध केले आहेत, असे म्हणतात. व्यासांनी अरुंधतीचा तारा वसिष्ठाच्या पुढे गेला असा जो उल्लेख केला आहे यावरून संपूर्ण महाभारताचा कालखंड निश्चितपणे शोधून काढता येईल, हे विधान डॉ. वर्तक यांनी १९७१ साली केले होते.

डॉ. प.वि. वर्तक यांनी लिहिलेली पुस्तके

  • A Realistic Approach To The Valmiki Ramayana
  • A scientific Interpretation of Ishvasya Upanishad
  • A Scientific Interpretation Of Kathopanishad
  • Bajirao The Great
  • Dazzling Draupadi
  • Essays On Vedic Culture And Literature ( Felicitation Volume)
  • Freedom Fighter V. D. Savarkar
  • The Geeta
  • The Gleams Of Science In The Upanisads And Srimad Bhagwat Gita
  • Hanuman, The Valiant; Not a Slave!
  • Karma & Brahmadharya
  • Rebirth
  • The Scientific Dating Of The Mahabharata War
  • The Scientific Dating Of The Ramayana & The Vedas
  • Shri Krishna, The Epoch Maker
  • Sui Generis Bheema
  • Veda - The Root Of Science
  • Veer Savarkar
  • उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण - भाग १ आणि २
  • ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
  • गीता - विज्ञाननिष्ठनिरूपण
  • तेजस्विनी द्रौपदी
  • संगीत दमयंती परित्याग
  • दास मारुति ? नही, वीर हनुमान् ! (हिंदी)
  • दास मारुति ? नव्हे, वीर हनुमान् ! (मराठी)
  • पहिले आणि एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर
  • ||पातंजल योग ||
  • पुनर्जन्म (मराठी)
  • पुनर्जन्म (हिंदी)
  • प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे
  • ||ब्रह्मर्षींची स्मरण यात्रा|| (आत्मकथन)
  • युगपुरुष श्रीकृष्ण
  • वास्तव रामायण
  • वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय
  • स्वयंभू
  • स्वातंत्र्यवीर सावरकर चावट कि वात्रट ?
  • स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमंत गीता