"मानसी सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मानसी सप्रे''' या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त...
(काही फरक नाही)

१२:४५, १९ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

मानसी सप्रे या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांच्या 'पुणे मर्डर क्रॉनिकल' या इंग्रजी कादंबरीने क्रॉसवर्ल्ड बेस्ट सेलर यादीत स्थान पटकावले आहे.

मानसी सप्रे या मूळच्या सांगलीच्या. त्यांचे वडील प्रा. अविनाश सप्रे हे वाङ्मयसमीक्षक आहेत. आईचे नाव प्रतिमा सप्रे. या दोघांनीही मानसीची लहानपणापासूनची साहित्य आणि माध्यमांची आवड जपली आणि तिच्या निर्णयांना सातत्याने प्रोत्साहन दिले.

=शिक्षण

मानसीने दहावीपासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वाचनाच्या माध्यमातून पैलू पाडायला सुरुवात केली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून दहावीला ९० टक्के गुण मिळविलेली मानसी अकरावीसाठी पुण्यात आली तिने फर्ग्युसन कॉलेजमध्येमध्ये ‌ कला शाखेत प्रवेश घेतला. इंग्रजीत बी.ए. करताना मानसीचा पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक आला. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी, इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असतानाही दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयूत) प्रवेश मिळवला व उच्च शिक्षणाची स्कॉलरशिपही प्राप्त केली.

व्यवसाय

मानसी सप्रे या सध्या (इ.स. २०१५) लेबारा टेलिकम्युनिकेशन कंपनीत भारतीय उपखंडाच्या कंटेंट हेड आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय मुंबईत असले तरी कामानिमित्त त्यांची जगभर भ्रमंती सुरू असते.

पुणे मर्डर क्रॉनिकल

मानसी सप्रे यांची ']]पुणे]] मर्डर क्रॉनिकल' ही बहुचर्चित कादंबरी वरवर पाहता पुण्याच्या पार्श्वभूमीवरील मर्डर मिस्ट्री आहे. परंतु पुण्यासारखे शहर, त्याचे वेगाने होणारे औद्योगिकीकरण व एका शहराची महानगराकडे वाटचाल होताना त्याच्या अंतरंगात होणारे बदल, आणि त्यातून जे धोके समोर येतात, ते या कादंबरीत आहेत. त्या अर्थाने ही पॉप्युलर फिक्शन असली तरी पॉप्युलर आणि क्लासिक ही सीमारेषा पुसून टाकणारी कादंबरी आहे.

कॉर्पोरेट सेक्टर आणि माध्यमांत काम करणाऱ्या मानसी सप्रेंनी या कादंबरीसाठी खॊप कष्ट घेतले. तपशील अचूक राहावेत यासाठी काही पोलीस अधिकारी, तसेच पत्रकारांसोबत काम केले. आपण लिहिलेले जगभर जाणार आहे, याचे भान त्यांना होते, त्यासाठी आवश्यक ते सर्व त्यांनी केले. मानसीने जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचावे, म्हणून इंग्रजीतून लिहिण्याचा पर्याय निवडला.


(अपूर्ण)