"शरद राजगुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ. शरद नरहर राजगुरू''' (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्...
(काही फरक नाही)

२२:३२, १० नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

डॉ. शरद नरहर राजगुरू (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्तीचे भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन महिन्याततच शरद राजगुरू यांनी जमशेदपूर येथे सरकारी नोकरी मिळाली, पण ती लवकरच सोडली. पुण्यातील टाय एक्स्प्लो जीव्ह्ज (एचई), मुंबईतील खंडेलवाल आणि नंतर मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक अन्ड कल्चरल अफेअर्स अशा ठिकाणीही त्यांनी भूशास्त्रज्ञ म्हणून नोकर्‍या केल्या. पण एकाही नोकरीत ते टिकले नाहीत.

नोकरीत आपल्याला काही तरी नवीन करायला-शिकायला मिळेल असे राजगुरू यांना वाटे. पण तसे काहीच न झाल्याने त्यांनी कोणत्या तरी संस्थेत जाऊन नवीन संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मे १९५८मध्ये पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातील डॉ. सांकलिया यांना पत्र लिहिले आणि आपली इच्छा कळविली. सांकलियांच्या सांगण्याप्रमाणे शरद राजगुरूंनी नोव्हेंबर १९५८मध्ये गोदावरी खोर्‍यातील पुरातत्त्व आणि पर्यावरणीय पुरातत्त्वावर संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांचे निवारण करता न आल्याने राजगुरूंनी पीएच.डी करण्याचा नाद सोडून दिला, आणि परत नोकरीचे कुठे जमते आहे का ते पहायला सुरुवात केली.