"मन्नू भंडारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २०: ओळ २०:
* आप का बंटी (कादंबरी)
* आप का बंटी (कादंबरी)
* एक इंच मुस्कान (कादंबरी, सहलेखक राजेंद्र यादव -१९६२)
* एक इंच मुस्कान (कादंबरी, सहलेखक राजेंद्र यादव -१९६२)
* एक कहानी यह भी (आत्मचरित्र)(या पुस्तकाला २००८ सालचा व्यास पुरस्कार मिळाला आहे)
* एक कहा.....????
* एक प्लेट सैलाब (कथासंग्रह -१९६२)
* एक प्लेट सैलाब (कथासंग्रह -१९६२)
* कितने कमलेश्वर! (आठवणी)
* कितने कमलेश्वर! (आठवणी)
* तीन निगाहों की एक तस्वीर (कथासंग्रह -१९६६)
* तीन निगाहों की एक तस्वीर (कथासंग्रह -१९६६)
* त्रिशंकु (कथासंग्रह)
* त्रिशंकु (कथासंग्रह)
* नायक खलनायक विदूषक (कथासंग्रह)
* Bunty (कादंबरी)
* बिना दीवारों का घर (नाटक -१९६६)
* बिना दीवारों का घर (नाटक -१९६६)
* मन्नू भंडारी की २० कहानियाँ
* मन्नू भंडारी की श्रेष्ठ कहानियाँ
* महाभोज (कादंबरी -१९७९) (आणि नाटक)
* महाभोज (कादंबरी -१९७९) (आणि नाटक)
* मुक्ति (कथासंग्रह)
* मुक्ति (कथासंग्रह)
* मेरी प्रिय कहानियाँ
* मैं हार गई (कथासंग्रह -१९५७),
* मैं हार गई (कथासंग्रह -१९५७),
* यही सच है (कथासंग्रह -१९६६)
* यही सच है (कथासंग्रह -१९६६)

२३:१५, ८ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी ऊर्फ मन्नू भंडारी (जन्म : भानुपुरा-मंदसौर जिल्हा,मध्य प्रदेश; ३ एप्रिल १९३१) या हिंदी लेखिका आहेत.

मन्नू भंडारी जन्माने मारवाडी आहेत. सुधारक वृत्तीचे वडील; घरात खूप मासिके, पुस्तके अशा वातावरणामुळे मन्नूंना वाचनाची, लेखनाची आवड निर्माण झाली. १९५० साली त्यांचे लग्न लेखक, समीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी झाले. लग्नानंतरही त्या मन्नू भंडारी याच नावाने लिखाण करीत राहिल्या. १९५०-६० दरम्यान हिंदीत नव्याने रुजू पाहणार्‍या नवकथेच्या चळवळीच्या काळातल्या त्या आघाडीच्या लेखिका आहेत.

मन्नू भंडारी १९४९मध्ये कलकत्ता विद्यापीठातून बी.ए. झाल्या आणि १९५२मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एम.ए. झाल्या

अध्यापनाची कारकीर्द

मन्नू भंडारी यांनी १९५२-६१ या काळात बालीगंज शिक्षा सदन येथे आणि, १९६१-६४ या काळात राणी बिर्ला कॉलेजात अध्यापन केले. १९६४मध्यी त्या मिरांडा कॉलेजात हिंदीच्या प्राध्यापक झाल्या आणि १९७१मध्ये निवृत्त होईपर्यंत त्र्थेच काम करीत राहिल्या. निवृत्तीनंतर १९९२-९४ दरम्यान उज्जैनमध्ये प्रेमचंद सृजनपीठ या संस्थेच्या प्रमुख होत्या.

’मैं हार गई’ ही मन्नू भंडारी यांची पहिली कथा. त्यांच्या अनेक कथा वास्तवावर आधारलेल्या आहेत.

मन्नू भंडारी यांच्या कादंबर्‍यांचे आणि कथांचे मराठी, सिंधी, गुजराथी, बंगाली, कानडी, उडिया, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी भाषांत अनुवादही झाले आहेत. त्यांच्या महाभोज या नाटकाचे मराठीतही प्रयोग झाले आहेत. अकेली आणि चष्मे या कथांचेही नाट्यरूपांतर झाले आहे. ’त्रिशंकु’ या कथेवर एक दूरदर्शन चित्रपट झाला आहे. मन्नू भंडारी यांनी प्रेमचंद यांच्या निर्मला कादंबरीवर आधारित हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे पटकथालेखन केले आहे. चित्रवाणीवरील दर्पण या हिंदी मालिकेसाठी त्यांनी विविध भारतीय भाषांतील दहा कथांचे लेखनही केले आहे.

मन्नू भंडारी यांचे पती कै.राजेंद्र यादव हे हिंदी नवकथेचे आद्य प्रवर्तक, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या ’एक इंच मुस्कान’ या कादंबरीतील नायिकेचा भाग मन्नू भंडारी यांच्या लेखणीतून उतरला आहे.

हिंदी साहित्यिक अजित कुमार यांनी भंडारींवर ’मन्नू भंडारीः जैसा मैने पाया’ या नावाचा एक परिचयग्रंथ लिहिला आहे.

मन्नू भंडारी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आँखों देखा झूठ (कथासंग्रह
  • आप का बंटी (कादंबरी)
  • एक इंच मुस्कान (कादंबरी, सहलेखक राजेंद्र यादव -१९६२)
  • एक कहानी यह भी (आत्मचरित्र)(या पुस्तकाला २००८ सालचा व्यास पुरस्कार मिळाला आहे)
  • एक प्लेट सैलाब (कथासंग्रह -१९६२)
  • कितने कमलेश्वर! (आठवणी)
  • तीन निगाहों की एक तस्वीर (कथासंग्रह -१९६६)
  • त्रिशंकु (कथासंग्रह)
  • नायक खलनायक विदूषक (कथासंग्रह)
  • Bunty (कादंबरी)
  • बिना दीवारों का घर (नाटक -१९६६)
  • मन्नू भंडारी की २० कहानियाँ
  • मन्नू भंडारी की श्रेष्ठ कहानियाँ
  • महाभोज (कादंबरी -१९७९) (आणि नाटक)
  • मुक्ति (कथासंग्रह)
  • मेरी प्रिय कहानियाँ
  • मैं हार गई (कथासंग्रह -१९५७),
  • यही सच है (कथासंग्रह -१९६६)
  • सयानी बुआ (कथासंग्रह)
  • सौदामिनी (कादंबरी)
  • स्त्री सुबोधिनी (कथासंग्रह)
  • स्वामी (कादंबरी)

मन्नू भंडारी यांचे अन्य लेखन

  • दूरचित्रवाणीवर गाजलेल्या रजनी या मालिकेतल्या टॅक्सीवाल्याचा प्रसंग, नोकरांवरचे अत्याचार, शिक्षणक्षेत्रातील गैरव्यवहार आदींचे लिखाण मन्नूंचे होते.
  • शबाना आझमी आणि अमोल पालेकर यांची भूमिका असलेला ’जीना यहाँ’ हा चित्रपट मन्नू भंडारी यांच्या ’एखाने आकाश नाई’ (इथे आकाश नाही) वर आधारित होता.
  • रजनीगंधा’ हा चित्रपट त्यांच्या ’यही सच है’ या कथेवरून बनवला होता.
  • त्यांच्या ’सजा’ या कथेचे मराठीत ’शिक्षा’ या नावाने भाषांतर झाले आहे.

मन्नू भंडारी यांच्या गाजलेल्या कथा

  • अकेली (मराठीत एकटी)
  • एक कहाणी अशीही (आत्मचरित्राचा मराठी अनुवाद)
  • कोण्या एकाचा मृत्यू (मराठी)
  • खोटे सिक्के
  • चष्मे (मराठीतही भाषांतरित)
  • त्रिशंकु
  • यही सच है
  • सजा

पुरस्कार

  • १९७६च्या आणीबाणीच्या काळातत मन्नू भंडारी यांना देऊ केला गेलेला पद्मश्री हा पुरस्कार त्यांनी नाकारला.
  • ’महाभोज’ या कादंबरीला रामकृष्ण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान पुरस्कार आणि पीपल्स अॅवॉर्ड मिळाले आहे.
  • मन्नू भंडारी यांना हिंदी अकादमी आणि राजस्थान साहित्य अकादमी यांचे पुरस्कार मिळाले आहेत.