"जयवंत दत्तात्रेय जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
ज.द. जोगळेकर (जन्म : १९२१) हे एक सावरकरप्रेमी पत्रकार आहेत. ते कायद्याचे पदवीधर होते. मूळचे बडोद्याचे असलेले जोगळेकर मुंबईत काही काळ ’द बाँम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात उपसंपादक होते. नंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या ’बेस्ट’ उपक्रमात संपर्क अधिकारी झाले. पत्रकार [[दि.वि. गोखले]] आणि ज.द.जोगळेकर यांची खास मैत्री होती. [[सावरकर|सावरकरांच्या]] निधनानंतर निघालेल्या ’विवेक’च्या [[सावरकर]] पुरवणीत दोघांचेही लेख होते. दोघेही युद्धशास्त्राचे अभ्यासक होते.
ज.द. जोगळेकर (जन्म : चिखलवाडी-मुंबई, ७ ऑक्टोबर १९२१) हे एक सावरकरप्रेमी पत्रकार आहेत. ते कायद्याचे पदवीधर होते. मूळचे बडोद्याचे असलेले जोगळेकर मुंबईत काही काळ ’द बाँम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात उपसंपादक होते. नंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या ’बेस्ट’ उपक्रमात संपर्क अधिकारी झाले. पत्रकार [[दि.वि. गोखले]] आणि ज.द.जोगळेकर यांची खास मैत्री होती. [[सावरकर|सावरकरांच्या]] निधनानंतर निघालेल्या ’विवेक’च्या [[सावरकर]] पुरवणीत दोघांचेही लेख होते. दोघेही युद्धशास्त्राचे अभ्यासक होते.


१९६५च्या चीन-भारत युद्धानंतर जोगळेकर यांनी ’नवशक्ति’च्या रविवारच्या अंकांतून ’युद्धतंत्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. तिचेच पर्यवसान त्यांच्या ’भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’ या ग्रंथात झाले. त्याला [[ना.ग. गोरे]] यांची प्रस्तावना होती. हा ग्रंथ अतिशय गाजला. इतका की, ग्रंथातील सिद्धान्ताला [[महादेवशास्त्री जोशी]] यांच्या संस्कृती कोशात स्थान मिळाले.
१९६५च्या चीन-भारत युद्धानंतर जोगळेकर यांनी ’नवशक्ति’च्या रविवारच्या अंकांतून ’युद्धतंत्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. तिचेच पर्यवसान त्यांच्या ’भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’ या ग्रंथात झाले. त्याला [[ना.ग. गोरे]] यांची प्रस्तावना होती. हा ग्रंथ अतिशय गाजला. इतका की, ग्रंथातील सिद्धान्ताला [[महादेवशास्त्री जोशी]] यांच्या संस्कृती कोशात स्थान मिळाले.
ओळ २१: ओळ २१:
* फ्रेन्च राज्यक्रांती
* फ्रेन्च राज्यक्रांती
* भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा
* भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा
* युगप्रवर्तनाच्या उंबरठ्यावरचे अरब जग
* रशियन राज्यक्रांती
* रशियन राज्यक्रांती
* डॉ. शोभा जोगळेकर : एका तपस्विनीची कथा (व्यक्तिचित्रण)
* डॉ. शोभा जोगळेकर : एका तपस्विनीची कथा (व्यक्तिचित्रण)
ओळ २६: ओळ २७:
* साम्यवादी देशातील फेरफटका
* साम्यवादी देशातील फेरफटका
* सेक्युलॅरिझम
* सेक्युलॅरिझम
* स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन
* स्वातंत्र्यवीर सावरकर एक वादळी जीवन
* हिंदुत्व
* हिंदुत्व
* हिंदुत्व आणि इतर विचारधारा
* हिंदुत्व आणि इतर विचारधारा
ओळ ३७: ओळ ३८:
* ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा (सावरकरांचे चरित्र)
* ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा (सावरकरांचे चरित्र)
* Decisive Battles India Lost (326 B. C. to 1803 A. D.)
* Decisive Battles India Lost (326 B. C. to 1803 A. D.)

==पुरस्कार==
* सावरकर राष्ट्रीय स्मारकाने दिलेला पुरस्कार (१९९८)


{{DEFAULTSORT:जोगळेकर,जयवंत दत्तात्रेय}}
{{DEFAULTSORT:जोगळेकर,जयवंत दत्तात्रेय}}

१३:४९, १४ मे २०१४ ची आवृत्ती

ज.द. जोगळेकर (जन्म : चिखलवाडी-मुंबई, ७ ऑक्टोबर १९२१) हे एक सावरकरप्रेमी पत्रकार आहेत. ते कायद्याचे पदवीधर होते. मूळचे बडोद्याचे असलेले जोगळेकर मुंबईत काही काळ ’द बाँम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात उपसंपादक होते. नंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या ’बेस्ट’ उपक्रमात संपर्क अधिकारी झाले. पत्रकार दि.वि. गोखले आणि ज.द.जोगळेकर यांची खास मैत्री होती. सावरकरांच्या निधनानंतर निघालेल्या ’विवेक’च्या सावरकर पुरवणीत दोघांचेही लेख होते. दोघेही युद्धशास्त्राचे अभ्यासक होते.

१९६५च्या चीन-भारत युद्धानंतर जोगळेकर यांनी ’नवशक्ति’च्या रविवारच्या अंकांतून ’युद्धतंत्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. तिचेच पर्यवसान त्यांच्या ’भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’ या ग्रंथात झाले. त्याला ना.ग. गोरे यांची प्रस्तावना होती. हा ग्रंथ अतिशय गाजला. इतका की, ग्रंथातील सिद्धान्ताला महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृती कोशात स्थान मिळाले.

ज.द. जोगळेकर हे हिंदुत्वाचे खंदे भाष्यकार आहेत. त्यांचे ’एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा’ नावाचे आत्मचरित्र त्यांच्या वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले.

जयवंतराव जोगळेकरांच्या डॉक्टर पत्नीचे नाव शोभा होते आणि मुलाचे विजय. जोगळेकरांनी आपल्या पत्नीवर एक व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लिहिले आहे.

ज.द. जोगळेकर यांची पुस्तके

  • अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव
  • अमेरिकन क्रांती
  • इंग्रजांच्या दृष्टिकोनातून १८५७चा प्रस्फोट
  • एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा (आत्मचरित्र)
  • चिनी राज्यक्रांती
  • जगातील इस्लामी समाजाची हालहवाल
  • जागतिक राष्ट्रवादाचे प्रवाह नि हिंदुस्थान
  • दोन युद्धे
  • निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार
  • पहिले क्रुसेड
  • पुनरुत्थान
  • फ्रेन्च राज्यक्रांती
  • भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा
  • युगप्रवर्तनाच्या उंबरठ्यावरचे अरब जग
  • रशियन राज्यक्रांती
  • डॉ. शोभा जोगळेकर : एका तपस्विनीची कथा (व्यक्तिचित्रण)
  • समीक्षा-संचित (निवडक ६३ ग्रंथपरीक्षणांचा संग्रह)
  • साम्यवादी देशातील फेरफटका
  • सेक्युलॅरिझम
  • स्वातंत्र्यवीर सावरकर एक वादळी जीवन
  • हिंदुत्व
  • हिंदुत्व आणि इतर विचारधारा
  • हिंदुत्ववादी धुरंधर नेते
  • हिन्दुस्तान पाकिस्तान - वैचारिक संघर्षाची प्रतीके
  • हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व
  • हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर
  • हिंदू राष्ट्रवादाचे स्रोत
  • हिंदूंच्या भवितव्याचा शोध
  • ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा (सावरकरांचे चरित्र)
  • Decisive Battles India Lost (326 B. C. to 1803 A. D.)

पुरस्कार

  • सावरकर राष्ट्रीय स्मारकाने दिलेला पुरस्कार (१९९८)