"संगीत रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संगीत रत्‍नाकर हा महाराष्ट्रामधल्या देवगिरी राज्यातील रामदेवर...
(काही फरक नाही)

१६:५९, १४ मार्च २०१४ ची आवृत्ती

संगीत रत्‍नाकर हा महाराष्ट्रामधल्या देवगिरी राज्यातील रामदेवराजाच्या काळातले आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ शारंगदेव, यांनी १३व्या शतकात रचलेला ग्रंथ आहे.. हा ग्रंथ आजही हिंदुस्तानी संगीताचा प्राण समजला जातो.

या ’संगीत रत्‍नाकर’ नावाच्या ग्रंथात शारंगदेव याने संगीताच्या सिद्धान्तांचे इतके अद्वितीय, सक्षम, स्पष्ट आणि प्रामाणिक विवेचन केले आहे, की असे करण्याची नुसती कल्पनाही करणे आजच्या घडीला असंभव समजले जाईल.

’संगीत रत्‍नाकरा’त शारंगदेवाने संगीताच्या महासागरात खोलवर जाऊन संगीतातले अत्यंत व्यापक आणि विशाल क्षेत्राचा परिचय करून दिला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या काळात आणि त्याच्याही अगोदर होऊन गेलेल्या सुमारे ४० पूर्वाचार्यांच्या मतांचे सार काढले आहे..

या चार-खंडी ’संगीत रत्‍नाकरा’त एकूण सात प्रकरणे आहेत. संस्कृतमधील संगीतावर लिहिल्या गेलेला हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. या ग्रंथावर सर्वात जास्त टीका लिहिल्या गेल्या आहेत, आणि आजवर कुठल्याही संगीतावरील ग्रंथाच्या नसतील तेवढ्या आवृत्त्या या ग्रंथाच्या निघाल्या आहेत.

जगांतल्या अनेक भाषांत ’संगीत रत्‍नाकर’ या ग्रंथाचे सर्वाधिक अनुवाद प्रकाशित झाले आहेत.