"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: या नावाची संमेलने अनेक संस्था भरवितात. त्यांपैकी काही संमेलने :-...
(काही फरक नाही)

१३:५२, १३ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

या नावाची संमेलने अनेक संस्था भरवितात. त्यांपैकी काही संमेलने :-

आंबेडकरी युवा साहित्य संमेलन

आतापर्यंत चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी रोहित नागदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

पाचवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन अकोला येथे २०-२१ एप्रिल २०१३ या तारखांना झाले.20 व 21 एप्रिलला होत आहे. लोकोत्तम साहित्य, कला व सांस्कृतिक मंच तथा दीनबंधू फोरमने संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी लेखिका प्रा. प्रतिभा अहिरे होत्या.

ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात.

भारतीय युवा साहित्य संमेलन

हे संमेलन मराठी भाषेपुरते मर्यादित नाही.

साहित्य अकादमीतर्फे ३०-३१ मे२०१३ या तारखांना दोन दिवसीय भारतीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात मुंबईत दादर (पूर्व) येथे झाले. आहे. डॉ. भालचंद्र नेमाडे संमेलनाध्यक्ष होते.

संमेलनात गुजराती साहित्यिक धीरुभाई पटेल यांचे उद्‌घाटनपर भाषण तर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर गुजराती, कोकणी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, सिंधी भाषेतील काव्यवाचन आणि दुपारी विविध भाषांमधील कथाकथनाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ' लेखक की कलम से-सृजनात्मक लेखन की मेरी प्रेरणाए ' या विषयावर परिसंवाद आणि विविध भाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरण्प्रेमी युवा साहित्य संमेलन

रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ’पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले.

संमेव्लनाच्या निमित्ताने१४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांतील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए. अबसर यांनी सांगितले.


पहा : साहित्य संमेलने