"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४: ओळ २४:
* पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नी
* पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नी
* मस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्नी, राजा छत्रसालाची मानसकन्या
* मस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्नी, राजा छत्रसालाची मानसकन्या
* यमुनाबाई : [[बापू गोखले]] यांच्या दोन पत्नींपैकी एक. यमुनाबाई बापूच्या मृत्यूनंतर साताऱ्यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ अष्टीच्या लढाईत मारला गेला.
* यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
* यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
* रमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
* रमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
ओळ ३०: ओळ ३१:
* लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
* लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.



दुसरे बाजीराव यांना ११ बायका होत्या, त्या अशा:
दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा:
* अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई
* अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई
* आठवले यांची कन्या
* आठवले यांची कन्या

२०:३०, २६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.

पेशवा हा बहुधा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजीने, त्याच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे प्रथम पेशवा मानले जातात. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजीने या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात.

पेशव्यांची कारकीर्द

श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशवे

श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता:

  1. बाळाजी विश्वनाथ पेशवे (इ.स.१७१४-१७२०)
  2. पहिले बाजीराव पेशवे (इ.स.१७२०-१७४०)
  3. बाळाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)
  4. माधवराव बल्लाळ पेशवे ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (इ.स.१७६१-१७७२)
  5. नारायणराव पेशवे (इ.स.१७७२-१७७४)
  6. रघुनाथराव पेशवे (अल्पकाळ)
  7. सवाई माधवराव पेशवे (इ.स.१७७४-१७९५)
  8. दुसरे बाजीराव पेशवे (इ.स.१७९६-१८१८)
  9. दुसरे नानासाहेब पेशवे (गादीवर बसू शकले नाहीत)

पेशवाईतील स्त्रिया

  • आनंदीबाई : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नी, ओकांची कन्या
  • काशीबाई : थोरल्या बाजीरावांची पत्नी
  • गंगाबाई : नारायणराव पेशव्यांची पत्नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
  • गोपिकाबाई : बाळाजी बाजीराव यांची पत्नी, रास्त्यांची कन्या
  • पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नी
  • मस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्नी, राजा छत्रसालाची मानसकन्या
  • यमुनाबाई : बापू गोखले यांच्या दोन पत्नींपैकी एक. यमुनाबाई बापूच्या मृत्यूनंतर साताऱ्यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ अष्टीच्या लढाईत मारला गेला.
  • यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
  • रमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
  • रमाबाई : थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.
  • राधाबाई : बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी, थोरल्या बाजीरावांची आई
  • लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.


दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा:

  • अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई
  • आठवले यांची कन्या
  • गोखल्यांची मुलगी.
  • पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई
  • फडके यांची कन्या राधाबाई
  • भागवतांची कन्या भागीरथीबाई
  • मंडलीक यांची कन्या (थोरल्या)सत्यभामाबाई
  • मराठे यांची कन्या लक्ष्मीबाई
  • रिसबूड यांची कन्या गंगाबाई
  • वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई. हिचा संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास होता. स्त्रियांना सर्वसाधारणपणे कसलेही शिक्षण देण्याचा प्रघात नसलेल्या त्या काळात ही लक्षणीय गोष्ट होती, आणि ह्यामुळे प्रभावित होऊन अनंतशास्त्री डोंगरे यांनी आपल्या मुलीला शिकविले. ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई म्हणून नावाजली गेली.
  • हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई

नाना फडणवीस यांच्या पत्‍न्या

नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या; नाना वारले तेव्हा त्यांची आठवी पत्‍नी बगाबाई व नववी जिऊबाई या देवसेवेसाठी सिद्धटेकला होत्या; त्यांना ही बातमी समजताच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांना ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यांनी फौज पाठविली. परंतु तिला या बायकांच्या सोबत असलेल्या अरबांनी हुसकावून दिले, असे मॅकडोनल्ड म्हणतो. या स्त्रिया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चौदा दिवसांनी वारली. जिऊबाईचे वय यावेळी नऊ वर्षांचे होते. तिने नानांनी अर्धवट ठेवलेले भीमाशंकराचे देऊळ बांधून पुरे केले. .
रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनवारवाड्यात आणून ठेविले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.

यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यानी प्रतिबंधात ठेविले. यशवंतराव होळकराने पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.

पुढे दोन वर्षांनी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाजीरावाकडून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहगड किल्ला सोडावयास लावला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले. पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरूच ठेवली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. नंतर बाई इंग्रजांच्या आसऱ्याने पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनीं तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.

इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने इ.स. १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही. अखेर इसवी सन १८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिने अखेरपर्यंत नानांचे नांव निष्कलंक राखिले. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनी बंद केली.

पेशव्यांच्या इतिहासावरील पुस्तके किंवा कादंबऱ्या

  • झेप -लेखक ना.सं. इनामदार
  • नानासाहेब पेशवे सेनापती तात्या टोपे - लेखिका: नंदिनी शहासने
  • पानिपत - लेखक विश्वास पाटील
  • पानिपतचा रणसंग्राम - लेखक सच्चिदानंद शेवडे
  • पेशवाईचा दरार - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचा ध्रुव ढळला - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचा पुनर्जन्म - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचा पुनर्विकास - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईची प्राणप्रतिष्ठा - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईची मध्यान्ह - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे दिव्य तेज - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे ध्रुवदर्शन - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे पानिपत - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे पुण्याहवाचन - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे पुनर्वैभव - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे मन्वंतर - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील उत्तर-दिग्विजय - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील कलिप्रवेश - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील दुर्जन - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील धर्मसंग्राम - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील पश्चिमदिग्विजय - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील यादवी - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईवर सावट - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईवरील गंडांतर - लेखक वि.वा. हडप
  • पेशवे - लेखक श्रीराम साठ्ये (प्रकाशनदिवस : अक्षय्य तृतीया, १३मे २०१३- पृष्ठसंख्या मासिकाच्या पानाच्या आकारातील ७८० पृष्ठे.)
  • पेशवे घराण्याचा इतिहास - लेखक प्रमोद ओक
  • प्रतापी बाजीराव - लेखक म.श्री.दीक्षित
  • बालाजी विश्वनाथ - लेखक म.वि. गोखले
  • बाळाजी बाजीराव - लेखक म.वि. गोखले
  • मंत्रावेगळा - लेखक ना.सं. इनामदार
  • राऊ - लेखक ना.सं. इनामदार
  • राघोभरारी - लेखक वासुदेव बेलवलकर
  • राजसत्तेच्या फटीतून पेशवेकालीन स्त्रिया - नीलिमा भावे
  • स्वामी - लेखक रणजित देसाई. (या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.)

हेसुद्धा पाहा