"जयवंत दत्तात्रेय जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज.द. जोगळेकर (जन्म : १९२१) हे एक सावरकरप्रेमी पत्रकार आहेत. ते कायद्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१८:३५, १५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

ज.द. जोगळेकर (जन्म : १९२१) हे एक सावरकरप्रेमी पत्रकार आहेत. ते कायद्याचे पदवीधर होते. मूळचे बडोद्याचे असलेले जोगळेकर मुंबईत काही काळ ’द बाँम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात उपसंपादक होते. नंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या ’बेस्ट’ उपक्रमात संपर्क अधिकारी झाले. पत्रकार दि.वि. गोखले आणि ज.द.जोगळेकर यांची खास मैत्री होती. सावरकरांच्या निधनानंतर निघालेल्या ’विवेक’च्या सावरकर पुरवणीत दोघांचेही लेख होते. दोघेही युद्धशास्त्राचे अभ्यासक होते.

१९६५च्या चीन-भारत युद्धानंतर जोगळेकर यांनी ’नवशक्ति’च्या रविवारच्या अंकांतून ’युद्धतंत्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. तिचेच पर्यवसान त्यांच्या ’भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’ या ग्रंथात झाले. त्याला ना.ग. गोरे यांची प्रस्तावना होती. हा ग्रंथ अतिशय गाजला. इतका की, ग्रंथातील सिद्धान्ताला महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृती कोशात स्थान मिळाले.

ज.द. जोगळेकर हे हिंदुत्वाचे खंदे भाष्यकार होते. त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले.

ज.द. जोगळेकर यांची पुस्तके

  • अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव
  • अमेरिकन क्रांती
  • इंग्रजांच्या दइष्टिकोनातून १८५७चा प्रस्फोट
  • एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा (आत्मचरित्र)
  • चिनी राज्यक्रांती
  • जगातील इस्लामी समाजाची हालहवाल
  • पहिले क्रुसेड
  • पुनरुत्थान
  • फ्रेन्च राज्यक्रांती
  • भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा
  • रशियन राज्यक्रांती
  • डॉ. शोभा जोगळेकर : एका तपस्विनीची कथा (व्यक्तिचित्रण)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन
  • हिंदुत्व आणि इतर विचारधारा
  • हिन्दुस्तान पाकिस्तान - वैचारिक संघर्षाची प्रतीके
  • हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर
  • हिंदू राष्ट्रवादाचे स्रोत
  • हिंदूंच्या भवितव्याचा शोध
  • ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा (सावरकरांचे चरित्र)