"महादेव विनायक गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ.म.वि. गोखले (पूर्ण नाव महादेव विनायक गोखले) (जन्म: २१ नोव्हेंवर १...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

०१:०३, २७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

डॉ.म.वि. गोखले (पूर्ण नाव महादेव विनायक गोखले) (जन्म: २१ नोव्हेंवर १९२९; मृत्यू : २८ ऑगस्ट २०१३) हे मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम. ए. केल्यावर ,’आरती वाङ्‌मयाचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पी‍एच.डी मिळवली. गोखले हे पुण्याच्या वाडिया कॉलेजात २९ वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. अमेरिकेतील ’इंडियाना’ विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.

गोखले सुरुवातीला गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत असत. हौशी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. चित्रपटक्षेत्रातही त्यांनी काही काळ दिग्दर्शन केले.

डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्‌मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते.

अध्यापन काळातच ते लेखनाकडे वळले. बालसाहित्य, प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली पुस्तके ८०हून अधिक आहेत.

डॉ. म.वि. गोखले यांनी लिहिलेली पुस्तके

  • ऐलमा-पैलमा (कादंबरी)
  • खंडोबल्लाळ
  • चांगदेव पासष्टी
  • छोटू आणि मोटू (कादंबरी)
  • नारद भक्तिसूत्रे
  • मराठी आरती
  • यशोदेला न्याय हवा (कादंबरी)
  • विवेकसिंधू
  • ज्ञानियांचा राजा (कादंबरी)

पुरस्कार

डॉ. म.वि.देशमुख यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र साहित्य परिषद २०११सालापासून दरवर्षी ’सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार’ देते.