"इंद्रायणी सावकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इंद्रायणी प्रभाकर सावकार (जन्म : जून २६, इ.स. १९३४) या मराठीतील ए...
(काही फरक नाही)

२१:०६, २५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

इंद्रायणी प्रभाकर सावकार (जन्म : जून २६, इ.स. १९३४) या मराठीतील एक खुसखुशीत लिखाणासाठी प्रख्यात असलेल्या लेखिका आहेत.

त्यांच्या वडिलांचे नाव त्रिंबक साठे आणि आईचे मनोरमा साठे. त्यांचे आजोबा रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब साठे हे वकील होते आणि आईचे वडील धर्मानंद कोसंबी ऊर्फ बापू हे संस्कृतचे प्रकांड पंडित आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. या दोघांमुळेच इंद्रायणींना संस्कृतची गोडी लागली.

शिक्षण

इंद्रायणी पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून १९४९मध्ये मॅट्रिक झाल्या. त्या परीक्षेत त्यांना संकृतमध्ये युनिव्हर्सिटीत पहिली आल्याबद्दल जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक आणि इंग्रजीत पहिली आल्याबद्दल दादाभाई नवरोजी पारितोषिक मिळाले. १९५३मध्ये इंद्रायणी, पुणे विद्यापीठातून बी.ए.(ऑनर्स), आणि १९५५मध्ये पॅरीस विद्यापीठातून डी.एल.( Doctorat es Lettres) झाल्या.

लग्न

लग्नानंतर इंद्रायणी साठे या इंद्रायणी सावकार झाल्या. त्यांचे पती प्रभाकर सावकार हे एम.एस्‌‍सी. पीएच.डी आहेत. या जोडप्याला लग्न होऊन सासरी गेलेल्या चार मुली आहेत. इंद्रायणी सावकार यांनी कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून सुमारे ४० मराठी पुस्तके लिहिली आहेत. मराठी मासिकांतून आणि त्यांच्या दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असलेल्या मराठी लघुकथा हे त्या अंकांचे भूषण असे.

इंद्रायणी सावकार यांनीं लिहिलेली मराठी आणि इंग्रजी पुस्तके

  • बाळा-बापू (कादंबरी)
  • भारतीय संस्कृतीचे शिल्पकार : ५७ ऋषींच्या महान गोष्टी (बालसाहित्य)
  • मृगया (कादंबरी)
  • रसवंती (पाकशास्त्र)
  • Our Inheritance Of Spirituality (माहितीपर)
  • Purple Grass (कथासंग्रह)
  • She, the Accused (कादंबरी-इ.स.१९९८). ही कादंबरीचे ’क्रॉसवर्ड’ने वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी विचारात घेतली होती.
  • The Men from Sun(कादंबरी-इ.स.२०००)
  • The Splendour of Ganesh Worship (माहितीपर - इ.स.२००३)
  • Weeds (कथासंग्रह)

(अपूर्ण)