"गणपती वासुदेव बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: गणपती वासुदेव बेहेरे हे मराठीतील एक नामवंत लेखक होते. पुण्याहून ... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२३:०७, १७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
गणपती वासुदेव बेहेरे हे मराठीतील एक नामवंत लेखक होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ’सोबत’ नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण ’अनिल विश्वास’या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात ’कटाक्ष’ आणि ’गवाक्ष’ ही सदरे लोकप्रिय होती.
ग.वा. बेहेरे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई. त्यांच्या घरात ज्ञानदायक व बुद्धिजीवी वातावरण होते. ग.वा. बेहेरे यांचे वडील उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. वडील इंग्रजीत लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ’इरिगेशन मॅन्युअल’ या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे.
ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नीतन मराठी विद्यालयातून झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या ’परशुरामियन’ नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची ’गोमंतकाचे अश्रू’ नावाची कथा छापली गेली होती.
ग.वा. बेहेरे यांनी लिहिलेली पुस्तके
- अंकुर (कादंबरी)
- अखेरचा प्रयोग
- आडवाट (कादंबरी)
- आनंदयात्रा (आत्मचरित्र)
- आली आठवण (कथासंग्रह)
- उतरंड (कादंबरी)
- गवाक्ष (कथासंग्रह)
- चकोरी
- जळणं थोडं बाकी आहे
- झुंज (कादंबरी)
- मोरपिसारा (काव्य)
- रंगढंग (लघुकथा)
- वाकडी वळणे (लघुकथा)
- संसारयात्रा (चरित्र)
- संसार संगीत (संकीर्ण लेख, सहलेखक अ.दि. कोकड)
- सुख सामोरी (लघुकथा)
- स्मरण
- हवलेले पुणे (लेखसंग्रह)
- हार आणि प्रहार