"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २८: ओळ २८:


उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..
उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..

==महाराष्ट्र साहित्य परिषद==

महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. ही परिषद मराठी साहित्य महमंडळाचा एक हिस्सा आहे. महामंडळाच्या वतीने आणि लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

* महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
* छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
* ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
* जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
* विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
* परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.


==इतिहास==
==इतिहास==

२२:२६, २६ मे २०१३ ची आवृत्ती



म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह
महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह

कार्य व उद्दिष्टे

शाखा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.

काही शाखा
  • आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद
  • महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर
  • कर्नाटक मराठी साहित्य परिषद
  • कोंकण मराठी साहित्य परिषद, पालघर शाखा, मालगुंड शाखा, वांद्रे शाखा; विले पार्ले शाखा, सावंतवाडी शाखा, वगैरे.
  • गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ
  • छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद
  • बडोदा साहित्य परिषद
  • मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ,भोपाळ
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा : अहमदनगर, आटपाडी, आळंदी, इचलकरंजी, इस्लामपूर, उल्हासनगर, कराड, कल्याण, किन्हवली, कोपरगाव, कोरेगाव(सातारा), कोल्हापूर, खेड(रत्नागिरी), चिंचवड, जळगाव, टिटवाळा, ठाणे, डोंबिवली, देहू, धुळे, नाशिक, पंढरपूर, पाचोरा, पिंपरी-चिंचवड, फलटण, बदलापूर, बारामती, बार्शी, बीड, बेलवंडी, मालेगाव, मुरबाड, भिवंडी, लासलगाव, वाई, वाडा, विक्रमगड, शहापूर, श्रीरामपूर, सांगली, सातारा, सासवड, सोनई, सोलापूर, हडपसर वगैरे.
  • मराठवाडा साहित्य परिषद
  • मुंबई साहित्य संघ
  • विदर्भ साहित्य संघ

संमेलने

महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.

त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.

उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..

महाराष्ट्र साहित्य परिषद

महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. ही परिषद मराठी साहित्य महमंडळाचा एक हिस्सा आहे. महामंडळाच्या वतीने आणि लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

  • महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
  • ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
  • जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
  • विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
  • परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.

इतिहास

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे इतर उपक्रम

  • ग्रंथपुरस्कार
  • साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे
  • नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
  • युवा मुक्त मंच - कथा लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
  • बालविभाग - बाल वाचनालय, बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
  • कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
  • साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
  • एकांकिका आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
  • ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
  • साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
  • सावित्रीबाई फुले अभ्यासिका : गरजू विद्यार्थिथीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
  • म.सा.पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र
  • कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
  • अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
  • अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
  • माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
  • तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
  • म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड १ व २ , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची,

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार

समवर्षी
  • अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास)
  • आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह)
  • गणेश सरस्वती ठाकूर देसाई पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
  • म.वि.गोखले पारितोषिक (नाट्यसमीक्षा/ नाटक)
  • रा.ना.नातू पारितोषिक (इतिहासविषयक)
  • शि.म.परांजपे पारितोषिक(ललितेतर वैचारिक)
  • सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
  • ह.ना.आपटे पुरस्कार (कादंबरी)
विषमवर्षी
  • ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)
  • ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक)
  • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
  • वा.म.जोशी पारितोषिक (कादंबरी)
  • वासुदेव धोंडो आणि भागिरथीबाई दीक्षित पारितोषिक (संत / धार्मिक)
  • स.ह.मोडक पारितोषिक(अनुवादित पुस्तक किंवा ज्येष्ठ अनुवादक)
  • ह.श्री.शेणोलीकर पारितोषिक (समीक्षा)
दरवर्षी
  • अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)
  • अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास)
  • कमल भागवत व के.पी.भागवत पुरस्कार (मानसशास्त्र,समाजशास्त्र, स्त्रीजीवनविषयक प्रश्न)
  • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र)
  • नी.स.गोखले पारितोषिक (उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती)
  • मृत्युंजय पुरस्कार
  • वि.वि.बोकील स्मृति पुरस्कार(उत्कृष्ट बालवाङ्‌मय)
  • स.रा.गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट वाङ्‌मयमूल्य असलेल्या ग्रंथास)
वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार
  • डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार
  • म.सा.प.चा सन्मान पुरस्कार
ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी
  • पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक)
ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी
  • मा.कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास)
  • डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार
  • डॉ.शं.दा.पेंडसे स्मृति पुरस्कार(संतसाहित्यविषयक - लेखकास)
ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी
  • कमलाकर सारंग पुरस्कार(नाट्यसंहिता / नाटककार)
  • कै.ग.ह.पाटील पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक)
  • गो.रा.परांजपे पुरस्कार(विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या - ज्येष्ठ लेखकास)
  • ना.घ.देशपांडे पुरस्कार (गेय कविता लिहिणाऱ्या कवीस)
  • भा.रा.तांबे पुरस्कार (ज्येष्ठ कवीस)
  • श्रीपाद जोशी पुरस्कार (संदर्भ ग्रंथ, अनुवाद आंतरभारती कार्य)
विशेष पुरस्कार
  • चिं.वि.जोशी पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी
  • कुसुमाग्रज पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी
  • शरदबाबू (ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत)पुरस्कार: विषमवर्षी; ८ मार्च
  • कवी यशवंत पुरस्कार: समवर्षी; ९ मार्च
  • शं.ना.जोशी पुरस्कार: दरवर्षी; २९ मार्च
  • प्रा.न.र.फाटक पुरस्कार: लीपवर्षी; १५ एप्रिल
  • दि.बा.मोकाशी : पुरस्कार: समवर्षी; २९ जून
  • बाबूराव शिरोळे पुरस्कार: विषमवर्षी; १४ जुलै
  • द.वा.पोतदार पुरस्कार: दरवर्षी; ६ ऑक्टोबर
  • विद्याधर पुंडलिक पुरस्कार: समवर्षी ९ ऑक्टोबर
  • डॉ.गं.ना.जोगळेकर पुरस्कार: दरवर्षी; १४ ऑगस्ट

संपर्क

दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659

अधिकृत संकेतस्थळे

  • मसाप
  • [१] महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर