"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था बापूराव देशमुख यांनी [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे स्थापन केली. त्यानंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था बापूराव देशमुख यांनी [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे स्थापन केली. त्यानंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.

विदर्भ साहित्य संघाचे ’[[युगवाणी]]’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.





१२:५०, २७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था बापूराव देशमुख यांनी जानेवारी १३, इ.स. १९२३ रोजी अमरावती येथे स्थापन केली. त्यानंतर तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हालवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलन भरवते.

विदर्भ साहित्य संघाचे ’युगवाणी’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.


कार्य

मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात.

विस्तार

सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, गोंडवण, गोंदिया(स्थापना १९५६), लाखनी, वर्धा, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.

लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. द.सा.बोरकरांनी स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.

पुरस्कार

दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१३सालासाठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार (प्रत्येक पुरस्कार ५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह) :

  • श्री. ना. पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी वाङ्‍मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांना विशेष पुरस्कार
  • पु. ल. देशपांडे स्मृति कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला
  • शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति कवितालेखन पुरस्कार प्रभू राजगडकर यांच्या 'निवडुंगाला आलेली फुलं' या काव्यसंग्रहाला
  • समीक्षा वाङ्‍मयासाठी देण्यात येणारा कुसुमानिल स्मृति समीक्षा पुरस्कार डॉ. हेमंत खडके यांना त्यांच्या 'अर्वाचीन मराठी काव्यविचार' या ग्रंथासाठी
  • बा. रा. मोडक स्मृति बालसाहित्य लेखन पुरस्कार डॉ. छाया कावळे यांना त्यांच्या ’बालकथा साहित्य : स्वरूप व चिंतन' या ग्रंथासाठी
  • सुजाता लोखंडे यांना त्यांच्या 'माझं नर्सिंग' या पुस्तकासाठी अण्णासाहेब खापर्डे स्मृति आत्मचरित्र लेखन पुरस्कार
  • नरेंद्र माहुरतळे यांना 'कार्गोची कणसं' या कथासंग्रहासाठी तसेच डॉ. सुरेश वर्धे यांना 'परिस्थितीला दिवस जातात तेव्हा' या ग्रंथासाठी नवोदित साहित्य लेखन पुरस्कार
  • यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त ' यशवंतराव चव्हाण स्मृती विशेष पुरस्कार ' प्रा. कोमल ठाकरे यांना 'मधुकर केचे : साहित्य पंढरीचा वारकरी' या ग्रंथासाठी.