"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७: ओळ ४७:
* मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
* मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
* मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
* मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
* मी राधा मीच कृष्ण (नाट्यगीत)
* मी राधा मीच कृष्ण (नाट्यगीत)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटकर)
* ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत)
* ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत)
* रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
* रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
ओळ ५९: ओळ ५९:
==अन्य==
==अन्य==


'''ज्योत्स्ना भोळे''' यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनही केले आहे. त्या अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या.
* '''ज्योत्स्ना भोळे''' यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनही केले आहे.
* त्या अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या.
* अखिल भारतीय नाट्य परिषद ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने दरवर्षी(?) पुरस्कार देते. १९७८साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी यांना मिळाला होता.
* ज्योत्स्ना भॊळे यांना १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.
* दया डोंगरे यांना २००८ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे पारितोषिक मिळाले होते.
* विद्या काळे यांना २०१०मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्योत्स्ना भोळे गौरव पारितोषिक मिळाले होते.
* पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा "बालगंधर्व' पुरस्कार ज्योत्स्ना भोळे यांना २०११(?) साली मिळाला होता.



==ज्योत्स्ना भोळे सभागृह==
==ज्योत्स्ना भोळे सभागृह==

२३:००, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) (मे ११ १९१४ - ऑगस्ट ५, २००१) या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झालाअ होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता.

ज्योत्स्ना भोळे यांचे ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.


ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका

  • अलंकार (वत्सला)
  • आंधळ्यांची शाळा (बिंबा)
  • आराधना (देवकी)
  • आशीर्वाद (सुमित्रा)
  • एक होता म्हातारा (उमा)
  • कुलवधू (भानुमती)
  • कोणे एके काळी (कल्याणी)
  • धाकटी आई (वीणा)
  • भाग्योदय (भानुमती)
  • भूमिकन्या सीता (सीता)
  • रंभा (सुगंधा)
  • राधामाई (राधा)
  • विद्याहरण ( देवयानी)
  • लपंडाव (?)


ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली गीते, भावगीते आणि नाट्यगीते(कंसात नाटकाचे नाव)

  • आला खुशीत्‌ समिंदर (कोळीगीत)
  • ऊठ मुकुंदा हे गोविंदा (नाट्यगीत)
  • एकलेपणाची आग लागली (नाट्यगीत)
  • कां रे ऐसी माया (नाट्यगीत)
  • किती वयाचे धराल भय (नाट्यगीत)
  • खेळेल का देव माझिया (नाट्यगीत)
  • छंद तुझा मजला का (नाट्यगीत)
  • जाई परतोनी बाळा (नाट्यगीत)
  • झाली पहाट झाली पहाट
  • तुझं नि माझं जमेना (नाट्य/द्वंद्वगीत)
  • तू माझी अन्‌ तुझा मीच (नाट्यगीत)
  • दे मज देवा जन्म हा (नाट्यगीत)
  • देवा बोला हो माझ्याशी
  • नको वळुन बघू माघारी (कोळीगीत)
  • नाच हृदया आनंदे (नाट्यगीत)
  • बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत)
  • बोला अमृत बोला (नाट्यगीत)
  • मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत)
  • मराठी असे आमुची (गीत)
  • माझिया माहेरा जा (भावगीत)
  • मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
  • मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
  • मी राधा मीच कृष्ण (नाट्यगीत)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटकर)
  • ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत)
  • रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
  • शुभमंगल या समया (नाट्यगीत)
  • सुखद या सौख्याहुनि (नाट्यगीत)
  • हा कोण गडे आला
  • होईल का हे स्वप्‍न खरे
  • हांस हांस रे हृदया (नाट्यगीत)
  • क्षण आला भाग्याचा (नाट्यगीत-कुलवधू)

अन्य

  • ज्योत्स्ना भोळे यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनही केले आहे.
  • त्या अनेक वर्षे ’महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या अध्यक्षा होत्या.
  • अखिल भारतीय नाट्य परिषद ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने दरवर्षी(?) पुरस्कार देते. १९७८साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी यांना मिळाला होता.
  • ज्योत्स्ना भॊळे यांना १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.
  • दया डोंगरे यांना २००८ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे पारितोषिक मिळाले होते.
  • विद्या काळे यांना २०१०मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्योत्स्ना भोळे गौरव पारितोषिक मिळाले होते.
  • पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा "बालगंधर्व' पुरस्कार ज्योत्स्ना भोळे यांना २०११(?) साली मिळाला होता.


ज्योत्स्ना भोळे सभागृह

पुणे शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या मालकीच्या सभागृहाला जोत्स्ना भोळे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.